शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

कोका वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांची झुंबड

By admin | Updated: April 23, 2017 00:45 IST

सन २०१३ मध्ये निर्मित भंडारा जिल्ह्याचे एकमेव कोका वन्यजीव अभयारण्यात जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत सुमारे १६००

१६०० पर्यटकांची भेट : जानेवारी ते मार्च मध्ये ९० हजारांचा महसूल युवराज गोमासे   करडी (पालोरा) सन २०१३ मध्ये निर्मित भंडारा जिल्ह्याचे एकमेव कोका वन्यजीव अभयारण्यात जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत सुमारे १६०० पर्यटकांनी पर्यटन केले असून सुमारे ९० हजाराचा महसूल प्राप्त झाला आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कोका वनविश्रामगृह, बाग बगीचे, बांबूच्या कुट्या, मचानी, पानवठे, चांगले रस्ते, राहण्याच्या व जेवणाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने पर्यटकांच्या संख्येत मागील तीन वर्षांच्या तुलनेत वाढ झालेली आहे. ‘अल्ला’ वाघणीचे तीन छावे अभयारण्याची शान ठरले आहेत. कोका वन्यजीव अभयारण्य भंडारा शहरापासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर आहे. भंडारा बसस्थानक व भंडारा रोड रेल्वे स्टेशन (२५ कि.मी.) हे जवळचे ठिकाण असून मोटारमार्गाने अभयारण्यात पोहचता येते. अभयारण्याचे मुख्य प्रवेशद्वार चंद्रपूर (कोका) येथे असून पर्यटकांना येथे बुकींग सुविधा उपलब्ध आहे. तसेच आॅनलाईन बुकींग सुविधा सुद्धा आहे. भंडारा शहरापासून पूर्वेला राष्ट्रीय महामार्गाने पलाडी तसेच शिंगोरी फाट्यावरून आमगाव, टेकेपार मार्गे येथे पोहचता येते. खासगी वाहनांची सुविधा भंडारा शहरातून उपलब्ध राहते. पर्यटकांना राहण्यासाठी कोका येथे वातानुकुलीत व अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त तसेच शौचालय, स्नानगृह, स्वतंत्र किचन व्यवस्था असे इंग्रजकालीन वनविश्रामगृह, भंडारा येथे शासकीय विश्रामगृह तसेच भंडारा शहरात खासगी हॉटेल स्वस्त दरात उपलब्ध आहेत. तुमसर व साकोली शहरातूनही राज्यमार्ग २७१ मार्गे येथे पोहचता येत असून बसस्थानक कोका व पालोरा हे थांबे आहेत. सौरउर्जेवर पानवठे असून पक्षी निरीक्षक करण्यासाठी मचानीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर अन्य पाणवठ्यांवर असून प्राण्यांच्या हालचाली जवळून पाहता येतात. जंगलात फिरण्यासाठी चांगले व चढउताराचे मार्ग तयार करण्यात आले आहेत. पर्यटन वाढीसाठी अभयारण्य प्रशासनाचे पर्यटन वाहनांची सोय उपलब्ध करून देण्यात येते. अभयारण्यात सकाळी ६ ते ११ वाजता पर्यंत तसेच सायंकाळी ३ ते ६ वाजतापर्यंत फेरफटका मारता येते. सायंकळी ७ वाजतापासून अभयारण्य पर्यटकांसाठी बंद असतो. तसेच रोज सायंकाळी ७ वाजतानंतर तुमसर ते साकोली राज्यमार्ग २७२ तसेच कोका ते शिंगोरी मार्ग बंद केला जातो. कोका अभयारण्य आठवड्याला प्रत्येक शुक्रवारी बंद असतो. कोका प्रादेशिक वनविभागाचे वतीने पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. चांगले बगीचे, मुलींसाठी झुले, बांबूचे हट, राहुट्या आदी व्यवस्था तयार करण्यासाठी वेगाने काम सुरु आहेत.