शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

गोसीखुर्द धरणावर पर्यटकांची मांदियाळी

By admin | Updated: August 19, 2015 01:02 IST

पर्यटनक्षेत्रात झपाट्याने वाढत असलेल्या विदर्भातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय गोसेखुर्द धरणाचे सौंदर्य जवळून पाहण्याकरिता रोजच मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात.

पर्यटकांचा आकडा लाखावर : मनमोहक दृश्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर प्रसन्नतापवनी : पर्यटनक्षेत्रात झपाट्याने वाढत असलेल्या विदर्भातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय गोसेखुर्द धरणाचे सौंदर्य जवळून पाहण्याकरिता रोजच मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. पण एकट्या स्वातंत्र्यदिनी जवळपास एक लक्ष पर्यटकांनी भेट देवून धरणाच्या सौंदर्याच्या आठवणी आपल्यासोबत नेल्या.गोसीखुर्द धरण या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत राहिले आहे. या धरणाच्या चर्चा राष्ट्रीय पातळीवर गेल्यामुळे या धरणाची राष्ट्रीय पातळीवर माहिती झाली. त्यामुळे विदर्भातील एक महत्वाचे पर्यटनस्थळ म्हणून गोसीखुर्द धरण समोर आले आहे.गोसीखुर्द धरणाच्या घाटउमरीच्या बाजूने असलेले घनदाट, विस्तीर्ण जंगल, उंच डोंगरदऱ्या, सभोवताल पसरलेले हिरवेगार रान, त्यातून पाणी खळखळत वाजत निघालेला उजवा कालवा. हे मनमोहक दृष्य पाहून या धरणाला भेट देणाऱ्या पर्यटकांचे मन मोहून जाते. या वर्षी पावसाळ्यात वैनगंगा नदीला आलेले अनेक पूर, त्यामुळे धरणात वाढलेल्या जलस्तरामुळे अनेकवेळा धरणाची सर्व ३३ वक्रद्वारे मोठ्या प्रमाणात उघडण्यात येवून त्यातून पाण्याचा मोठा विसर्ग वैनगंगा नदीत करण्यात आला आहे.सर्व ३३ वक्रद्वारातून धो-धो करीत निघणारे पांढरे शुभ्र पाण्याचे सौंदर्य पाहण्याची मजा काही वेगळीच. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या संख्येने पर्यटक गोसीखुर्द धरणाला भेट देतात. स्वातंत्र्यदिनी जवळपास १ लक्ष पर्यटकांनी या धरणाला भेट देवून धरणाच्या आठवणी सोबत नेल्या. याच दिवशी धरणाची २७ वक्रद्वारे अर्ध्या मिटरने उघडण्यात आली होती. त्यामुळे धरणाच्या सौंदर्याचा पर्यटकांना अधिकच आनंद घेता आला. दररोज शनिवारी, रविवारी व सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येतात. लहान मुलांना फिरण्याकरिता घोडाही राहत असल्यामुळे त्यांना मोठी मजा येते. स्वातंत्र्यदिनी गोसीखुर्द धरणासोबतच पर्यटकांनी रुयाड (सिंदपुरी) येथील महासमाधी महास्तूप, ऐतिहासीक किल्ला, अष्टविनायकांपैकी एक पंचमुखी गणेश मंदिर या स्थळालाही भेटी देवून त्यांच्या आठवणी मनात साठवून नेल्या. (तालुका प्रतिनिधी)