शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनस्थळ देवसराळ अजूनही उपेक्षित

By admin | Updated: February 14, 2017 00:16 IST

सन २०१२ पासून पर्यटन स्थळ ‘क’ दर्जा प्राप्त देवसराळ (घुटेरा) पर्यटन विकास निधीच्या अभावाखाली अजूनही उपेक्षित आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

राहूल भुतांगे तुमसरसन २०१२ पासून पर्यटन स्थळ ‘क’ दर्जा प्राप्त देवसराळ (घुटेरा) पर्यटन विकास निधीच्या अभावाखाली अजूनही उपेक्षित आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.पर्यटन स्थळाची पर्वणी लाभलेल्या तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगाच्या कुशित वसलेल्या निसर्गरम्य तसेच जागृत महादेवाचे मंदिर असलेल्या देवसराळ (घुटेरा) तिर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ घोषित व्हावे म्हणून युवा नेता ठाकचंद मुंगुसमारे यांनी प्रयत्न करून सन २०१२ मध्ये देवसराळला ‘क’ दर्जा पर्यटन स्थळ मिळवून दिले खरे. मात्र पर्यटन विकास महामंडळाअंतर्गत मिळणारा अती अल्पनिधी त्यातही पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व असल्याने सतत या विभागात निधीचा ठणठणात पाहायला मिळत आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळात पर्यटन स्थळी जाण्याकरिता फक्त एक सिमेंट मार्ग व तेही अरुंदच बांधण्यात आले. परिणामी तिथुन ये- जा करतांना अनेकदा अपघातालाही सामोरे जावे लागत आहे. मंदिरात जाण्याकरिता पायऱ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. निसर्गरम्य देवसराळ येथे जागृत महादेवाचे मंदिर असून ते १०० वर्षापुर्वीचे आहे. टेकडी व मोठे दगड चिरुन तिथून महादेवाच्या मूर्तीची निर्मिती झाली. काही दशकांपासून महाराष्ट्र व लगतच्या मध्यप्रदेशातील भाविक मोठ्या संख्येने येथे येत असतात. महादेवाचे महात्म्य व निसर्गाची मुक्तहस्ताने उधळण यांची भुरळ पाडणारा देवसराळ (धुटेरा) पर्यटन स्थळ आहे.याठिकाणी वर्षातून चार वेळा संक्राती, शिवरात्री, नागपंचमी व श्रावण मासात भव्य यात्रा भरते. हजारो नागरिकांचे लोंढे देवसराळ येथे येत असतात. पंरतु पाहिजे तसा पर्यटन क्षेत्राचा विकास होवू शकत नसल्याची खंत हजारो भाविकांनी वाटते. मात्र प्रत्यक्षात पर्यटन विकास निधीच्या नावावर पश्चिम महाराष्ट्राचे लोक डल्ला मारत आहे. याकडे लोकप्रतिनिधीनी जातीने लक्ष घालुन पर्यटन विकास निधी उपलब्ध करुन उपेक्षीत असलेल्या पर्यटन क्षेत्राचा विाकस करावा अशीच पर्यटनप्रेमींची मुख्य मागणी आहे.