शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

विषय समितीच्या सभापतिपदासाठी रस्सीखेच

By admin | Updated: January 18, 2017 00:22 IST

नगरपरिषदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष व स्विकृत सदस्याची निवडीनंतर आता वेळ आली ती विषय समिती व त्याच्या सभापतीच्या निवडीची. यातही सभापतीची निवड होणार की निवडणूक होणार?...

लवकरच होणार निवड : साकोलीचे तहसीलदार प्रभारी संजय साठवणे साकोलीनगरपरिषदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष व स्विकृत सदस्याची निवडीनंतर आता वेळ आली ती विषय समिती व त्याच्या सभापतीच्या निवडीची. यातही सभापतीची निवड होणार की निवडणूक होणार? या सभापतीपदासाठी आता रस्सीखेच सुरू झाली असून साकोली व सेंदुरवाफा या दोन्ही गावातून दोन दोन सभापती येणार काय व सभापती पदासाठी कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.काल सोमवारी न.प.उपाध्यक्ष म्हणून तरूण मल्लाणी यांची तर स्विकृत सदस्य म्हणून मोहन चांदेवार व अ‍ॅड. दिलीप कातोरे यांची अविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर नगरपरिषदेची पहिली बैठक पार पडली व यानंतर सात दिवसाच्या आत दुसरी बैठक घेवून या बैठकीत विषय समिती गठीत करण्यात येणार आहे. साकोली नगरपरिषद ही नवीन असल्यामुळे यात आरोग्य समिती, बांधकाम समिती, महिला व बाल कल्याण समिती, जल आणि मलनिसारण समिती अशा एकूण चार समित्या स्थापन केल्या जाऊ शकतात. यात महिला व बालकल्याण समितीचे सभापती हे या महिला नगरसेवकच राहिल्या तर उर्वरित तीन समित्यांचे सभापती हे महिला किंवा पुरूष यापैकी कोणालाही घेता येतात. एका विषय समितीमध्ये पाच सदस्य राहत असून त्यात एक सभापती व चार सदस्य राहतील तर एक स्थायी समिती असेल व या समितीचे अध्यक्ष हे नगरपरिषदेचे अध्यक्ष हे पदसिद्ध अध्यक्ष असतात.साकोली नगरपरिषदेमध्ये अध्यक्षासह इतर १४ सदस्य हे भाजपाचे असल्यामुळे विषय समितीवर भाजपाच्याच नगरसेवकांची वर्णी लाणार हे निश्चित. यात अध्यक्ष हे सेंदुरवाफा तर उपाध्यक्ष हे साकोलीचे तर स्वीकृत सदस्यातही एक साकोली व एक सेंदुरवाफा येथील घेण्यात आली. त्यामुळे आता विषय समिती स्थापन करतानी याच फार्मुल्याचा विचार केल्यास दोन सभापती साकोली व दोन सभापती सेंदुरवाफा येथील होऊ शकतात. तसेच प्रभागनिहाय विचार सुद्धा होऊ शकतो. मात्र या सभापतीपदासाठी कोणाची वर्णी लागेल याची सध्या जुळवाजुळव सुरू आहे.प्रभारी मुख्याधिकारीसाकोली नगरपरिषद घोषित होताच साकोलीचे तहसीलदार खडतकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर निवडणुका पार पडल्या अध्यक्षानी पदमुक्त केले. आता तहसीलदार हेच या नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कार्यत आहेत.प्रशासकीय अधिकारीही प्रभारीचसध्या प्रशासकीय अधिकारी म्हणून परमार यांनी आठवड्यातून फक्त तीन दिवस नियुक्ती केली आहे. परमार याचेकडे तुमसर नगरपरिषदेचा कार्यभार आहे. परमार हे फक्त तीन दिवस येत आहेत. प्रशासकीय अधिकारी व मुख्याधिकारी दोन्ही प्रभारी असल्यामुळे साकोली नगरपरिषदेचे कामे रखडलेली आहेत. त्यामुळे ही दोन्ही पदे शासनाने तात्काळ व्यवस्था करावी, अशी मागणी आहे.