तहसीलदारांना निवेदन : राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेची मागणीतुमसर : पावसाने दगा दिल्याने यावर्षी अत्यंत अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे धान पेरणी अपुर्णच आहेत. पावसाची आस संपल्याने शेतकरी चिंतेत सापडला असतांना त्याच्या परिवारावर उपासमारीचे डोंगर कोसळल्याने तुमसर तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.यावर्षी अति अल्प पावसाची नोंद तुमसर तालुक्यात झाली असून फक्त ३० टक्केच रोवण्या पूर्ण झाले आहेत. आणि आता तर पावसाची अपेक्षा करणे बेकार असल्याने शेतकऱ्यांवर आसमानी संकट ओढविले असतांना शेतकऱ्यांकडे दुसरे कोणतेही जोडधंदे नसल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. तसेच बावनथडी प्रकल्पात कोष्टी क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन नहरात गेल्या आहेत. परंतु अजूनपर्यंत शासनातर्फे शेतकऱ्यांना कोणताही अनुदान मिळालेला नाही. त्यांना त्वरित अनुदान देय करावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेकडून मोठे आंदोलन करणार असल्याचा इशाराही दिला. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अंकुर ठाकूर, निशिकांत पेठे, घनश्याम गुप्ता, अतुल कारेमोरे, गोपाल सोनी, आफताब राजा, अरशद मिर्झा, समिर वंजारी, स्वप्नील मेश्राम, ओम करमकर, सांकेत गजभिये उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
तुमसर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा
By admin | Updated: August 23, 2015 00:56 IST