प्रकरण नगरसेवकावरील हल्ल्याचे : हल्लेखोर नागपूरचा सुपारी किलर, पोलिसांसमोर कबुलीतुमसर : राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत ऊके यांच्यावर प्राणघातक हल्ला करुन आरोपी पसार झाले. या हल्ल्याचा मोहरक्याला साथीदारासह नागपुरातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.निलेश जगदिश भोंडे (३०) रा. सिताबर्डी नागपुर, अमोल महेंद्र मेश्राम (२८) रा. रमाई नगर कामठी असे अटक केलेल्यांची नावे आहेत. घटनेच्या आदल्या दिवशी निलेश भोंडे व त्याचा साथीदार अमोल मेश्राम हे टाटा सुमोने तुमसर येथे आले. त्यांना तुमसरातील साथीदार मिळाले. पुर्व नियोजनानुसार ते सर्व गाडीत बसून जुना बसस्टँड मार्गे तुमसर कटंगी मार्गावरील शासकीय आयटीआय समोरील नगरसेवक उके यांच्या घर बांधकामालगत दबा धरुन बसले होते. सकाळी ६.४५ वाजता दरम्यान नगरसेवक दुचाकीने तुमसर-कटंगी मार्गावरील घराचे बांधकाम पाहण्याकरिता येत असल्याचे सांगितल्याने निलेश भोंडे या मोहरक्याने ऊकेवर चारचाकी वाहनाने धडक दिली. यामुळे उके खाली पडताच संतोष दहाट याने प्रथम चाकूने हल्ला केला. अचानक झालेल्या चाकु हल्ल्याने भांबावलेल्या ऊके यांनी जीव वाचविण्यासाठी पळ काढण्याचा प्रयत्न करीत असताना बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्या. गोळी चुकविण्याच्या नादात ऊके नाल्यात पडल्याने गोळया लागून त्यांचा मृत्यू झाल्याचे समजून मारेकरी घटनास्थळावरुन मेहगाव- मिटेवानी -जांब कांद्री मार्गे नागपुर पसार झाल्याची कबुली दिली. (तालुका प्रतिनिधी / शहर प्रतिनिधी)म्होरक्या डी.बी. पथकाच्या जाळ्यातमोहरक्या नागपुरचा मर्डरिस्ट (सुपारी किलर) मोहरक्या नीलेश भोंडे रा. बाराखोली इंदिरा नागपूर हल्ली मुक्काम काचेपुरा सिताबर्डी याने मार्च २०११ मध्ये नागपुरचा गुंड मोंटू विनोद हिरनवार याचा खून करुन अधिराज्य गाजविने सुरु केले. दरम्यान संतोष दहाट व नगरसेवकात आपसी वाद सुरु असल्याने काही कामानिमित्त संतोष हा कामठी येथे आल्यानंतर त्याची ओळख अमोल मेश्रामशी झाली. त्या दरम्यान त्याने नगरसेवकाची मनमानी सुरु असून तुमसरकरांना त्रास देत असल्याची माहिती सांगून त्यांनी मलाही मारले असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याचा काटा काढायचे असल्याचे संतोषने अमोलला सांगितल्याने संतोषची भेट निलेश भोंडेसोबत करुन देत नगरसेवकाचा काटा काढण्यासंदर्भात त्याला सुपारी देण्यात आली होती.१० ते १५ दिवसापासून त्याच्यावर पाळत ठेवून होते. १२ आॅगस्टला नगरसेवकावर हल्ला करण्यात आला. तुमसर पोलिसांच्या डी. बी. पथकाच्या कार्यवाहीने मोहरक्या व त्याच्या साथीदाराला पकडण्यात यश आले.
‘त्या’ हल्ल्यातील म्होरक्या जेरबंद
By admin | Updated: August 17, 2015 00:23 IST