शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांपासून ऊसाचे चुकारे थकीत

By admin | Updated: April 15, 2015 00:29 IST

वैनगंगा शुगर अ‍ॅण्ड पॉवर लिमिटेड कारखान्याने जानेवारी २०१५ पासून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या ऊसाच्या चुकाऱ्याचे वाटप केले नाही...

करडी (पालोरा) : वैनगंगा शुगर अ‍ॅण्ड पॉवर लिमिटेड कारखान्याने जानेवारी २०१५ पासून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या ऊसाच्या चुकाऱ्याचे वाटप केले नाही. दि. ३१ मार्चपर्यंत चुकारे हाती न पडल्याने शुन्य टक्के व्याजाच्या रकमावर बँकाना व्याजाचा भुर्दंड द्यावा लागणार आहे. १५ दिवसात चुकारे वाटपाचे आश्वासन कारखान्याने पाळले नाही. थकीत चुकाऱ्याचे तातडीने वाटप करण्यात यावे, ऊसाला २,२०० रुपये भाव देण्यात यावा, अन्यथा कारखान्यावर पदयात्रा मोर्चा काढण्याचा इशारा मोहाडी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला आहे. मोहाडी तालुक्यातील वैनगंगा शुगर अ‍ॅण्ड पॉवर लिमिटेड कारखान्यामुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन पहावयास मिळणार असे चित्र रंगविण्यात आले. कारखान्याच्या संचालकानी सुध्दा ऊसाला अधिक भाव देण्याचे आश्वासन देण्याबरोबर ऊस कटाईपासून न चुकता १५ दिवसात चुकाऱ्याचे वाटप करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सर्व आश्वासने खोटे ठरले. शेतकऱ्यांची फसवणुक करण्यात आली. लखपती शेतकरी तयार होण्याअगोदरच कंगाल शेतकरी दिसू लागला आहे. अच्छे दिन शेतकऱ्यांना कधीच दिसले नाहीत. परिणामी कारखाना प्रशासनाच्या बेजबाबदारपाणचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.देव्हाडा स्थित वैनगंगा शुगर कारखान्याचा गाळप हंगाम माहे नोव्हेंबर २०१४ मध्ये करण्यात आला. तेव्हापासून शेतकऱ्यांना २० जानेवारी पर्यंतच्या ऊसाच्या चुकाऱ्यांचे वाटप करण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांना पैसे अजुनही मिळाले नाहीत. ऊसाचा भावही कमी देण्यात आला. जानेवारी ते मार्च २०१५ पर्यंतचे लाखो रुपयांचे चुकारे कारखान्याकडे थकीत आहेत. चुकारे लवकर होतील, अशी आश्वासने देण्यात आली. १५ दिवसात चुकारे देण्याचे आश्वासन पाळले नाही. यावर्षीचा खरिप हंगाम बुडाला. रब्बी पिकांनाही ऊन, पाऊस, वाऱ्याने झोडपले. शेतकऱ्यांच्या शेतातील सोने मातीमोल ठरली. ऊसाच्या पैशाने निदान बँकाचे कर्ज भरता येईल, ही आशा शेतकऱ्यांना होती. मात्र तीसुध्दा फोल ठरली. ३१ मार्चपर्यंत शुन्य टक्के व्याजदरांची कर्ज भरणे आवश्यक असते. पंरतू पैसेच हाती न आल्याने शुन्य टक्के रक्कमेच्या कर्जावर आता व्याज दयावा लागणार आहे. शेतकरी त्यामुळे अडचणीत सापडला आहे. कारखान्याने लवकरात लवकर थकीत चुकाऱ्याचे वाटप करावे.विलंबासाठी व्याजाचा भुर्दण्ड दयावा, ऊसाला प्रती टन २२०० रुपये भाव दयावा आदी मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसने केल्या आहेत. चुकाऱ्याचे त्वरित वाटप न झाल्यास १५ दिवसानंतर कारखान्यावर शेतकऱ्यांचा पदयात्रा मोर्चा काढण्याचा व गेट समोर सभा घेण्याचा इशारा मोहाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव संजय भोयर यांनी दिला आहे. (वार्ताहर)तर ऊस लागवडीवर पडणार फटकाकारखान्यावर जानेवारीपासून जवळपास ६ कोटी रुपयांचे चुकारे थकीत आहेत. कारखानदार पैसा नसल्याचे सांगतात. मात्र दुसरीकडे कारखान्यासाठी नवनविन यंत्र सामुग्री थेट पैसा देऊन खरेदी केली जात आहे. उसाचे चुकारे थकीत होत असल्याने शेतकऱ्यात नाराजी आहे. त्याचा परिणाम ऊस लागवडीवर होत आहे. - वासुदेव बांते, अध्यक्ष राकॉ. मोहाडीचुकारे लवकरच देऊसाखरेचे मुल्यांकन वारंवार बदलत असल्याने बँकाकडून पाहिजे त्याप्रमाणात पैसा उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही स्थिती संपूर्ण राज्याची आहे. शेतकऱ्यांचे चुकारे दिले जातील, थोडा अवधी लागेल. ऊसाला सरसकट १,७०० रुपये प्रति टनाचा भाव दिला जात असून बैलबंडीने वाहतुक करणाऱ्यांना १०० रुपये वाढवून दिले जात आहे.- दादा टिचकुले, उपाध्यक्ष, वैनगंगा शुगर अ‍ॅण्ड पॉवर देव्हाडा.