शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

विक्री केलेल्या धानाचे पैसे थकीत

By admin | Updated: July 6, 2015 00:36 IST

शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या हमी भाव धान खरेदी केंद्रावर विकल्या गेलेल्या धानाचे अजूनही ...

शेतकरी हवालदिल : सहकारी संस्थांना मन:स्तापनवेगावबांध : शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या हमी भाव धान खरेदी केंद्रावर विकल्या गेलेल्या धानाचे अजूनही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. तसेच ज्या सहकारी संस्थांनी आपल्या बँक लिमीट मधून काही शेतकऱ्यांचे चुकारे अदा केलेत त्या संस्था देखील डबघाईस आल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.उन्हाळी पिकासाठी शासनातर्फे धान खरेदी करण्यासाठी विविध ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यासाठी १३५० रुपये प्रति क्विंटल हमी भाव निश्चित करण्यात आला होता. शासकीय खरेदी केंद्र असल्या कारणाने शेतकऱ्यांनी आपला उत्पादित केलेला धान केंद्रावर विकला. परंतु सुमारे दीड-ते दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना त्यांच्या विकल्या गेलेल्या धानाचे पैसे मिळाले नाहीत. आता नवीन हंगाम सुरू झाला त्यामुळे बियाणे, खत व औषधी खरेदी करण्यासाठी व मजुरी देण्यासाठी पैशांची नितांत आवश्यकता आहे. तरी सुद्धा शासनातर्फे शेतकऱ्यांचे पैसे देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगाम कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.तसेच काही सहकारी संस्थांनी आपल्या बँक लिमीट मधून पैसे काढून काही शेतकऱ्यांचे पैसे दिलेत. शेतकऱ्यांचे काम व्हावे व शासनातर्फे लवकरच आपल्याला पैसे मिळतील असा संस्थांचा उद्देश होता. परंतु शासनाच्या दिरंगाईच्या धोरणामुळे पैशांअभावी बऱ्याच संस्था डबघाईस आल्यासारख्या आहेत. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी २५० रुपये प्रतिक्विंटल दराने शासनाने बोनस जाहीर केला. त्यासाठी ५२ कोटी रुपये देणार असल्याचे शासनातर्फे मागेच जाहीर करण्यात आले. परंतु बोनसचे पैसे कुठे अजूनपर्यंत अडकून आहेत हे कुणालाच माहिती नाही. शासनातर्फे मार्केटिंग फेडरेशनला पैसे पाठविले जातात व त्यानंतर फेडरेशनतर्फे विविध सहकारी संस्थांना पैसे दिले जातात. त्यानंतर शेतकऱ्यांना पैसा मिळतो. परंतु अजुनपर्यंत पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नसल्यामुळे शासनाच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या होत असलेल्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी शासनातर्फे सहकारी संस्थांच्या माध्यमातून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येतात. परंतु शासनच दिरंगाईचे धोरण अवलंबून धान उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप होत आहे. बरे धानाच्या भाववाढीवर राजकारण करणारे पदाधिकारीही या बाबीवर मूग गिळून गप्प आहेत. शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन तसेच सहकारी संस्थांची परिस्थिती लक्षात घेऊन त्वरित खरेदी केलेल्या धानाचे चुकारे व बोनस अदा करावे, अशी मागणी सहकारी संस्थांचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)