शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

टायर फुटून कार उलटली अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:19 IST

प्रजासत्ताक दिनाची सुटी साजरी करण्यासाठी नागपूरहून नागझिरा अभयारण्यात आलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कार टायर फुटल्यामुळे रस्त्याच्या बाजुला उलटली.

ठळक मुद्देसाकोलीजवळ अपघात : नागझिराहून परतताना झाला अपघात

आॅनलाईन लोकमतसाकोली : प्रजासत्ताक दिनाची सुटी साजरी करण्यासाठी नागपूरहून नागझिरा अभयारण्यात आलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कार टायर फुटल्यामुळे रस्त्याच्या बाजुला उलटली. यात सहा विद्यार्थ्यांपैकी एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अन्य पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारला दुपारी १ वाजता आलेबेदर गावाजवळ घडली.आदित्य अतकरी (१९) रा.गणेशनगर नागपूर असे मृताचे नाव आहे. नागपूर येथील केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयाचे द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाचे सहा विद्यार्थी प्रजासत्ताक दिवसाची सुटी साजरी करण्यासाठी कार (एमएच ३०/ एच ३३५२) ने नागझिरा अभ्यारण्यात आले होते. अभयारण्याच्या पिटेझरी गेटवर पोहोचले. परंतु बुकिंग नसल्यामुळे त्यांना अभयारण्यात प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे ते नागपूरला परतीसाठी निघाले.यावेळी कारमध्ये चार विद्यार्थी मागे तर दोघे समोर बसले होते. कार श्रेयांश सोईतकर हा चालवित होता. दरम्यान पिटेझरीच्या समोर आलेबेदर परिसरात कारचा डाव्या बाजुचा समोरचा टायर अचानक फुटला. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला जावून उलटली. या कारने तीनचार पलट्या खाल्ली. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे आदित्य अतकरी याचा जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी अक्षय शिवाजी वैतागे (२४) रा.इतवारी नागपूर याच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास उपनिरीक्षक रवींद्र रेवतकर हे करीत आहेत.