शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खाटांअभावी रुग्णांवर जमिनीवर उपचाराची वेळ

By admin | Updated: November 23, 2015 00:35 IST

मागील अनेक वर्षापासून लाखांदूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा म्हणून केलेली मागणी लाखांदूर ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा मिळाल्यानंतरही धूळ खात पडली आहे.

व्यथा लाखांदूरची : उपजिल्हा रुग्णालयाची मागणी धूळ खात लाखांदूर : मागील अनेक वर्षापासून लाखांदूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा म्हणून केलेली मागणी लाखांदूर ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा मिळाल्यानंतरही धूळ खात पडली आहे. खाटांची ३० व्यवस्था असल्याने जमीनीवर रुग्णांवर उपचार करण्याची वेळ डॉक्टरांवर येवून पडली आहे.लाखांदूर हे तालूक्याचे ठिकाण भंडारा जिल्हयाच्या शेवटच्या टोकावर गडचिरोली जिल्हयाला लागून नक्षल प्रभावित आहे. तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्र असताना प्रामुख्याने ग्रामीण रुग्णालयातच रुग्णांना उपचाराकरिता, लोकसंख्येनुसार ग्रामीण रुग्णालयात सोयी सुविधांचा अभाव यामुळे ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळाला पाहिजे ही नागरिकांची आग्रही मागणी प्रशासनाकडून कानाडोळा केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. नुकतेच लाखांदूर ग्रामपंचायतीचा नगरपंचातीचा दर्जा मिळाला. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा अपेक्षित असतांना लोकप्रतिनिधी जनप्रतिनिधी जातीने लक्ष देवून जनतेची मागणी शासनाकडे रेटून धरणे गरजेचे असल्याचे बोलले जाते.येथील ग्रामीण रुग्णालयात विष प्राषण, प्रसुती, अपघातात जखमी रुग्ण, सर्पदंश, कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया, हायड्रोशिल शस्त्रक्रिया शिबिरे मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात. या रुग्णालयात मागील कित्येक वर्षापासून केवळ ३० खाटांची व्यवस्था केल्या गेली आहे. पंरतु रुग्णांचे वाढते प्रमाण बघून खाटा वाढविणे गरजेचे आहे. प्रसूतीकरिता आलेल्या महिला सिझर करिता त्रास सहन करीत असेल तर ती व्यवस्था या रुग्णालयात नसल्याने जिल्हा रुग्णालयात रेफर केल्या जाते. यावेळी बाळ व माता मृत्यूचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचा आलेख दिसून येतो. येथील रुग्णालयात जनरेटरची सोय नाही, ब्लड बँक नाही, रक्त तपासणी, एक्सरे नाही, आठवड्यातून काही दिवस ठरले असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. उन्हळयाचे दिवस सुरु झाले लोडशेडिंगच्या काळात रुग्ण अंधारात मात्र रात्रपाळीचे कर्मचारी कुलर लावून सुखाची झोप घेतांनाचे चित्र दिसते. एकूणच उपजिल्हा रुग्णालयाची मागणी पूर्ण झाल्यास, येथील रुग्णांना सर्वतोपरी उपचार घेऊन सुदृढ शरीराची आशा पल्लवीत होऊ शकते. रुग्णालयात आवश्यक औषध साठा व साहित्य उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना बाहेरुन औषध विकत घ्यावे लागते. (तालुका प्रतिनिधी)