शहरं
Join us  
Trending Stories
1
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
2
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
3
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
4
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
5
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
6
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
7
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
8
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
9
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
10
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
11
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
12
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
13
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
14
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
15
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
16
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
17
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
18
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
19
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही

मॅग्निज खाणीतील मजुरांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST

चिखला व डोंगरी बु. खाणीत कंत्राटदार मजुराची संख्या सुमारे १५० इतकी आहे. खाणी लॉकडाऊन झाल्यानंतर मागील तीन आठवड्यापासून मजुरांना कंत्राटदारांनी वेतन दिले नाही. याप्रकरणी मजुरांनी कंत्राटदारांन विचारले असता त्यांनी खाणीकडून आम्हाला राशी मिळालेली नाही. त्यामुळे तुम्हाला वेतन देण्यास आम्ही असमर्थ आहोत, अशी भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देतीन आठवड्यांपासून वेतन नाही : चिखलीत व डोंगरी खाणीतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता ३ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. तुमसर तालुक्यातील चिखला व डोंगरी मॅग्निज खाणीतील कंत्राटदाराच्या मजुरांना मागील तीन आठवड्यापासून वेतन मिळाले नाही. केंद्र शासनाने कर्मचारी व मजुरांना वेतन न थांबविण्याचे आदेश दिले असताना केंद्र शासनाच्या खाणीतील मजुरांना वेतन दिले गेले नाही. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.चिखला व डोंगरी बु. खाणीत कंत्राटदार मजुराची संख्या सुमारे १५० इतकी आहे. खाणी लॉकडाऊन झाल्यानंतर मागील तीन आठवड्यापासून मजुरांना कंत्राटदारांनी वेतन दिले नाही. याप्रकरणी मजुरांनी कंत्राटदारांन विचारले असता त्यांनी खाणीकडून आम्हाला राशी मिळालेली नाही. त्यामुळे तुम्हाला वेतन देण्यास आम्ही असमर्थ आहोत, अशी भूमिका घेतली आहे.कंत्राटदाराकडील मजूर गरीब असून रोजंदारी मजूर म्हणून ते मॅग्निज खाणीत कामे करतात. दररोज कमावून आणणे व खाणे अशी त्यांची स्थिती आहे. इतर कामे बंद आहेत. त्यामुळे सध्या मजुरांची उपासमार होत आहे. मॉईल प्रशासनाने कंत्राटदारांची थकबाकी दिली नाही. हे मुख्य कारण कंत्राटदार मजुरांना सांगत आहेत. जिल्हा परिषद सदस्य संगिता सोनवाने, जिल्हा परिषद सदस्य शुभांगी रहांगडाले, सुरेश रहांगडाले, दिलीप सोनवाने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार करून मजुरांना तात्काळ वेतन मॉईल प्रशासनाने द्यावा, अशी मागणी केली आहे.चिखला येथे कंत्राटदास मजुरांची सोशल डिस्टन्सिंग ठेवून सभा झाली. यात मजुरांनी कंत्राटदारांनी वेतन देण्याची एकमुखी मागणी केली तथा जिल्हाधिकाºयांना निवेदन पाठविण्यात आले. चिखला येथे भूमिगत खाण आहे. या भूमिगत खाणीत सदर मजूर जोखमीचे काम करतात. मॉईल प्रशासन भविष्यनिर्वाह निधी जमा करतो. १५ दिवसापर्यंत पुरेल इतके अन्नधान्य त्यांच्याकडे जमा होते. आता अन्नधान्य संपला आहे. मजुरांनी मॉयल प्रबंधकांशी भेटून चर्चा केली. त्यांनी संबंधित कंत्राटदारांना मजूरांचे वेतन देण्यास सांगण्यात आल्याचे सांगितले. परंतु कंत्राटदारानी अजुनपर्यंत मजुरांना वेतन दिले नाही.केंद्र शासनाच्या खाणीतील मजुरांची उपासमार सुरू असल्याची तक्रार मजुरांनी थेट केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद पटेल यांचेकडे केली आहे. लाकडाऊन संपल्यावर गोबरवाही येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा मजुरांनी दिला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही राज्य शासनाकडे यासंदर्भात तक्रार केल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य संगिता सोनवाने, चिखलाचे माजी उपसरपंच दिलीप सोनवाने यांनी दिली.