शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
2
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
3
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं करण कळताच पती हादरला!
4
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
5
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
6
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
7
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
8
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
9
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
10
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
11
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
12
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
13
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
14
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
15
Mumbai: विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेची जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव
16
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
17
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
18
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
19
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
20
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे

माजी सैनिकावर गृहोपयोगी साहित्य विकण्याची वेळ

By admin | Updated: April 14, 2015 00:50 IST

१९६२ मध्ये भारत पाकिस्तान युध्दाचा साक्षीदार असलेल्या केवळराम लोणारे या माजी सैनिकाला शासनाने पाच एकर शेतजमीन

शासनाकडून अवहेलना : शेती जमिनीसाठी लढा सुरूचप्रशांत देसाई ल्ल भंडारा१९६२ मध्ये भारत पाकिस्तान युध्दाचा साक्षीदार असलेल्या केवळराम लोणारे या माजी सैनिकाला शासनाने पाच एकर शेतजमीन दिली होती. त्यानंतर सरकारने ती शेतजमीन परत घेतली. शेतीसाठी मागील ४३ वर्षांपासून ते शासनाशी लढा देत आहेत. शासनाकडून त्यांची अवहेलना सुरू असून महिन्याला केवळ ८९२ रूपये निवृत्ती वेतन दिले जात आहे. माजी सैनिक असलेल्या केवळराम व त्यांच्या वृध्द पत्नीवर गृहपयोगी साहित्य व घरातील सोन्याचे दागिणे विकून उदरनिर्वाह करण्याचा प्रसंग ओढवला आहे.लाखनी तालुक्यातील नान्होरी येथील केवळराम महादेव लोणारे यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर मेकॅनिकलचे व्यावसायिक प्रशिक्षण घेतले. त्यानंतर ते देशसेवा करण्यासाठी भारतीय सैन्यात दाखल झाले. सैन्यात ५८ प्लाँट कंपनीत सीएफएन या पदावर रुजू झाले. काही वर्षांच्या सेवेनंतर १९६२ मध्ये भारत व पाकिस्तान या देशांमध्ये युध्द झाले. या युध्दाच्या वेळेस नादुरूस्त झालेली वाहने दुरूस्ती करण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. त्यानंतर प्रकृती स्वास्थ्यामुळे त्यांनी नोकरी सोडली. त्यांच्या सेवेची दखल घेऊन शासनाने साकोली तालुक्यातील मोगरा येथील ३०२/१२, ३०२/१३ ही पाच एकर शेती त्यांना देण्यात आली. त्यानंतर साकोलीचे तत्कालीन तहसीलदार पी. जी. मुनघाटे यांनी त्यांना जमीन देण्यात आलेले प्रमाणपत्र दिले. कालांतराने साकोली तालुक्याचे विभाजन होऊन लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. यात शासनाने दिलेली शेतजमीन राखीव वनक्षेत्रात घोषित करण्यात आली. त्यामुळे ती जमीन वन विभागाला हस्तांतरीत करण्यात आली. त्यामुळे या जमिनीच्या संदर्भात केवळराम यांचे कोणतेही दस्तावेज बनविण्यात आले नाही. बक्षिसात दिलेली जमीन शासनाने वनबंदोबस्ताच्या कायद्याखाली परत घेतली. मात्र, त्यांना दुसरीकडे कुठेही जमीन देण्यात आली नाही. त्यामुळे ते मागील ४३ वर्षांपासून जमिन मिळावी, यासाठी महसूल विभागाच्या कार्यालयात उंबरठे झिजवित आहेत. दरम्यान त्यांना माजी सैनिकाचे केवळ ८९२ रूपये सेवानिवृत्ती वेतन मिळत आहे. तुटपुंज्या वेतनात उदरनिर्वाह करताना त्या वृद्ध दाम्पत्यांना अडचणी येत आहेत. संरक्षण विभागाच्या केंद्रीय सैनिक बोर्डच्या सामाजिक उत्थान विभागाचे संयुक्त उपसंचालकांनी १६ सप्टेंबर २०१४ ला त्यांचे निवृत्तीवेतन एक हजार रूपये करण्याचे पत्र पाठविले आहे. मात्र, त्यापासूनही त्यांना वंचित राहावे लागत आहे. ७४ वर्षीय केवळरामला स्वत:सह वृध्द पत्नीचा उदरनिर्वाह करण्यासाठी शासनाकडून मदत मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्यांना घरातील टिव्ही, गृहपयोगी साहित्यासह पत्नीचे दागिणे विकावे लागल्याची कैफियत त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयात येऊन मांडली. देशसेवेसाठी आयुष्य झिजविणाऱ्या माजी सैनिकाला वृध्दावस्थेत आधाराची गरज असताना त्यांची शासनाकडून अवहेलना सुरू आहे. आतातरी न्याय मिळेल या अपेक्षेत उंबरठे झिजविणे सुरू आहे.