शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

समयसूचकतेमुळे विद्यार्थिनी सुखरुप

By admin | Updated: May 12, 2016 00:42 IST

वेळ रात्री ८.३० ची. तुमसर रोड रेल्वे स्थानकावर नवव्या वर्गात शिकणारी (खुशबू) काल्पनिक नाव. शाळकरी मुलगी येरझरा मारीत होती.

रेल्वे पोलिसांचे सहकार्य : तुमसर रोड रेल्वे स्थानकावरील प्रसंग तुमसर : वेळ रात्री ८.३० ची. तुमसर रोड रेल्वे स्थानकावर नवव्या वर्गात शिकणारी (खुशबू) काल्पनिक नाव. शाळकरी मुलगी येरझरा मारीत होती. एकटीच असल्याने तिची नजर येणाऱ्या-जाणाऱ्याला न्याहाळत होती. तुमसर रोड रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याच्या चाणाक्ष नजरेने ते बघितले. काहीतरी या मुलीसोबत चुकले आहे. रेल्वे पोलीस तिच्याजवळ जाऊन आस्थेने विचारपूस केल्यावर तिने गूढ उकलले. रेल्वे पोलिसाच्या समयसूचकतेने अनर्थ टळला.दोन दिवसांपूर्वी रात्री ८.३० च्या सुमारास एक शाळकरी मुलगी तुमसर रोड रेल्वे स्थानकावर दुचाकीने आली. दुचाकी ठेवल्यावर तिने रेल्वे स्थानकात प्रवेश केला. एक्स्प्रेस व लोकल प्रवासी गाड्यांचे ये-जा सुरु होते. १४ ते १५ वर्षे वयोगटातील ही मुलगी रेल्वेस्थानकावर येरझारा मारीत होती. काही वेळाने रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस अमर ढबाले यांच्या चाणाक्ष नजरेने ते हेरले. काही वेगळे या मुलीच्या मनात वादळ घोंघावत असल्याची पक्की खात्री ढबाले यांची झाली. रेल्वे पोलीस ढबाले त्या मुलीजवळ गेले. आस्थेने विचारपूस केली. तिला रेल्वे पोलीस ठाण्यात घेऊन आले. थंड पाणी तिला दिले. पुन्हा मुख्य चौकशी सुरु केली. त्या मुलीने आपले नाव, शहराचे नाव, घरचा भ्रमणध्वनी क्रमांक सांगितला. घरी अभ्यासाचा तगादा लावला जायचा. त्याला कंटाळून मी तुमसर रोड रेल्वे स्थानकावर आली. येथे आल्यावर काय करावे असा प्रश्न पला. आपण स्वत:ला संपवावे की कुठे निघून जावे हा वाईट विचार मनात येत होता. मी निर्णय घेऊ शकत नव्हते. म्हणून रेल्वे स्थानकावर येरझारा मारीत होते असे त्या मुलीने सांगितले. त्या मुलीच्या घरी संपर्क साधून कुटुंबीयांना बोलाविण्यात आले. कटू प्रसंगाचे आनंदात रुपांतर झाले. कुटुंबीयांनी मात्र रेल्वे पोलिसांनी नाव उघड करू नये अशी विनंती केली. (तालुका प्रतिनिधी)