शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दिघोरीत मारबतीची परंपरा कायम

By admin | Updated: September 14, 2015 00:17 IST

येथील मारबत उत्सव संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. सन १९०७ पासून सुरु झालेली ही परंपरा आजही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.

१०८ वर्षांची मारबत : सामाजिक एकोपामुकेश देशमुख दिघोरी / मोठी येथील मारबत उत्सव संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. सन १९०७ पासून सुरु झालेली ही परंपरा आजही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ‘ईळा पिढा टळो व बळीचे राज्य येवो’च्या गजरात मारबत उत्सव साजरा करण्यात आला.सकाळी ८ वाजता येथील शिव मंदिरात गावातील वॉर्डावॉर्डातून तयार झालेल्या मारबती एकत्रीत आल्या. यावर्षी एकूण २१ मारबती (पुतळे) संपूर्ण गावातून बनविण्यात आले होते. सदर उत्सव ग्रामपंचायत कमेटी, तंटामुक्त गाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या मारबत उत्सवात मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक एकोप्याचे उदाहरण सादर केले. शिव मंदिरातून निघालेली पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात मारबतींची रॅली गावातील मुख्य रस्त्याने काढण्यात आली. तरुणाई डी.जे. च्या तालावर थिरकत होती तर वयोवृद्ध तंट्या भिल्लच्या दांडपट्टा बघण्यात मग्न होती. मागील तीन वर्षांपासून धुरपता गोटेफोडे ही महिला या उत्सवात स्वत: मारबत पकडत असते. त्यामुळे महिलांची उपस्थिती तथा उत्साह या मारबत रॅलीत बघण्यासारखा असतो. रॅलीतील प्रत्येक मारबतींवर विशेष असे शिर्षक दिलेले असतात. यात भ्रष्टाचार, रोगराई व इतर अनेक विषयांचा समावेश असतो. रॅलीत सहभागी झालेल्या मारबतींवर विविध विषयांवर आधारीत देखावा तथा संदेश लिहण्यात आला होता. यात शेतकऱ्यांच्या व्यथेपासून तर महागाईचे सावट आदी विषयांचा समावेश होता. संपूर्ण २१ ही मारबतींवर मनोरंजनात्मक शिर्षक लिहिले होते. मागील १०८ वर्षापासून संपूर्ण दिघोरीवासी जनता मारबत उत्सवात हिरहिरीने भाग घेऊन या उत्सवाचा आनंद घेत असतात. मारबत उत्सवामुळे गावात एकीचे व खेळीमेळीचे वातावरण निर्माण होण्यास खूप मदत होत असल्याचे दिसून येते. रॅलीदरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला ग्रामस्थांच्या सहकार्याने दिघोरीवासिांनी अन्य गावांपुढे आदर्श घालुन दिला आहे.