शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

थकीत मानधनासाठी आयटकचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 22:00 IST

वसुंधरा एकात्मिक पाणलोट विकास सचिव संघटना, महाराष्ट्र राज्य शाखा जिल्हा आयटकतर्फे पाणलोट सचिवांच्या थकित मानधनाला घेवून सोमवारी धरणे देण्यात आले. सदर आंदोलन त्रिमुर्ती चौकात करण्यात आले. यात जिल्हाधिकाºयांना तथा जिल्हा कृषी अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : वसुंधरा एकात्मिक पाणलोट विकास सचिव संघटनेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वसुंधरा एकात्मिक पाणलोट विकास सचिव संघटना, महाराष्ट्र राज्य शाखा जिल्हा आयटकतर्फे पाणलोट सचिवांच्या थकित मानधनाला घेवून सोमवारी धरणे देण्यात आले. सदर आंदोलन त्रिमुर्ती चौकात करण्यात आले. यात जिल्हाधिकाºयांना तथा जिल्हा कृषी अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे पाणलोट सचिवांचे आजपर्यंत संपूर्ण थकीत मानधन देण्यात यावे, थकीत प्रवासभत्ता व कार्यालयीन खर्च अदा करण्यात यावा, पाणलोट समिती सचिवांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी समाविष्ट करण्यात यावे, यासह अन्य १६ मागण्यांचा पूर्ततेसाठी या सचिवांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या अंतर्गत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यासमोरील त्रिमुर्ती चौकात धरणे देण्यात आले. आंदोलाचे नेतृत्व आयटकचे जिल्हाकार्याध्यक्ष शिवकुमार गणवीर, जिल्हा सचिव हिवराज उके, पाणलोट संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश्वर घाटबांधे, उपाध्यक्ष रमेश गोमासे व सचिव भैय्याजी मलोडे यांनी केले.मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाद्वारे जिल्हा कृषी अधीक्षक यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इंदूराव चव्हाण यांनी पाणलोट सचिवांचे थकीत मानधन लवकरच काढून देण्यात येईल, असे मान्य केले. तसेच शासनस्तरावरच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. शासनाने मागण्यांची पुर्तता त्वरीत करावी, अन्यथा संघटनेच्या वतीने आगामी फेब्रुवारी महिन्यात मुंबई मंत्रालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असेही संघटनेच्यावतीने जाहीर करण्यात आले. यावेळी मौसम पवनकर, रामदास राघोर्ते, नितीन मोहारे, अनिल भुसारी, पुनेश्वर रामटेके, सरोज भवरिया, मंजू बावनकर, किशोर बनकर, ईश्वर निंबार्ते, भारगौव वाघमारे, भुमेंद्र गाते आदी उपस्थित होते. आंदोलनाचे संचालन हंसराज झलके यांनी तर आभार जागेश्वर पाल यांनी मानले.