शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
8
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
9
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
10
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
11
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
12
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
13
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
14
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
15
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
16
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
17
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
18
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
19
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
20
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द

सिहोरा परिसरात वाघांची दहशत

By admin | Updated: December 22, 2016 00:47 IST

सातपुडा पर्वतरांगांच्या जंगल शेजारी असणाऱ्या गावात वाघाने गाई ठार केल्या आहेत.

गावाशेजारी वाघांचे दर्शन : सायंकाळ होताच गावकऱ्यांत भीती चुल्हाड (सिहोरा) : सातपुडा पर्वतरांगांच्या जंगल शेजारी असणाऱ्या गावात वाघाने गाई ठार केल्या आहेत. या वाघांचे दर्शन परिसरातील अन्य गावात होत आहेत. यामुळे सायंकाळ होताच घराबाहेर पडणे नागरिकांचे कठिण झाले आहे. या परिसराची अवस्था व्याघ्र प्रकल्पासारखी झाली आहे. ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ व सातपुडा पर्वत रांगांच्या घनदाट व राखीव जंगलात वाघांची हजेरी परिसरात चर्चेचा विषय झाली आहे. जंगलाशेजारी असणाऱ्या सोंड्या, मुरली, सोनेगाव गावाच्या हद्दीत वाघाने गाई व बैल ठार केले आहे. दरम्यान या वाघाचे दर्शन गावकऱ्यांना गाव शेजारी होत असल्याने वाघांच्या संख्येत वाढ झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चांदपूरच्या जंगलात वाघांनी बस्तान मांडल्याने परिसरातील नागरिकांत चर्चा सुरु झाल्या आहेत. जंगलात नागरिकांनी फेरफटका मारणे बंद केले आहे. टेमनी शिवारात शेतकऱ्यांना वाघ दिसून आल्यानंतर पिपरी चुन्ही, वाहनी, मांडवी गावाच्या शिवारात वाघांचे दर्शन नागरिकांना झाले आहे. यामुळे शेतशिवारात ये जा करण्यास शेतकरी दहशतीत आहेत. या गावाशेजारी वाघाने जनावरांना ठार केले आहे. संपूर्ण परिसर व्याघ्र प्रकल्पासारखी अवस्था असल्याचे दिसून येत आहे. गावागावात वाघ दिसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान दावेझरी शिवारात वाघाने रापनी बसला मार्गावरच रोखले होते. अशी माहिती दावेझरीच्या सरपंच गायत्री चौरागडे यांनी दिली. वाहनी शिवारात वाघ आढळल्याची माहिती पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र ढबाले यांनी दिली. वन विभागाच्या यंत्रणेने अलर्ट राहण्याची गरज आहे. काही दिवसात ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाला इको टुरीझम मध्ये विकास घडून येणार आहे. यामुळे पर्यटनस्थळात वाघ व अन्य वन्य प्राण्यांचे दर्शन पर्यटकांना सोने पे सुहागा ठरणार आहे. वन विभागाचे रिक्त जागा भरण्याची गरज आहे. दरम्यान पर्यटनस्थळाचा घनदाट जंगल सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेपर्यंत विस्तारीत आहे. याच धरणाचा मार्ग मध्यप्रदेश राज्याला जोडण्यात आला आहे. शिकाऱ्यासाठी हा मार्ग उपयुक्त आहे. याच मार्गाचा अवैध व्यवसायीक उपयोग करीत आहेत. वन विभागाच्या नियंत्रणात मार्ग नाही. याच मार्गावरून वाहनांची रेलचेल वाढल्याने संशय बळावला आहे. आंतरराज्यीय सीमेवर पोलिसांची चौकी व वन विभागाची तपासणी आहे. यामुळे राज्य मार्गावरून वाहनांची वर्दळ मंदावली आहे. अवैध व्यावसायि पळवाट शोधत असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. दरम्यान यासंदर्भात बपेराचे परिक्षेत्राधिकारी सी.एस. कामथे यांच्या संपर्क साधला असता होऊ शकला नाही. (वार्ताहर)