शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

वितरिकेत आढळलेल्या वाघाची शिकारच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 05:00 IST

वाघाचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला, ते क्षेत्र पेंच व्याघ्रप्रकल्पाला जाेडणारा महत्त्वाचा वन्यप्राण्यांसाठी भ्रमणमार्ग आहे. मृत पावलेल्या वाघाचे वय दाेन वर्षांपेक्षा कमी असून स्वतंत्र अधिवासाच्या शाेधात असताना स्थानिक वाघांशी झालेल्या झटापटीत ताे गंभीर जखमी झाला असावा; तसेच उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाला. असा प्राथमिक अंदाजही यावेळी व्यक्त करण्यात आला. शवविच्छेदनानंतर वाघाच्या मृतदेहावर अंतिम दाहसंस्कार करण्यात आले.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तुमसर तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बपेरा आंबागड गावशिवारातील बावनथडी वितरिकेत गुरुवारी सायंकाळी मृतावस्थेत आढळलेल्या  वाघाची शिकारच झाल्याची बाब समाेर आली आहे. एकीकडे प्रशासन स्थानिक वाघांशी झालेल्या झटापटीत ताे गंभीर जखमी झाल्याचे सांगत असले तरी वैद्यकीय तज्ज्ञांनी या वाघाची सापळा रचून शिकार केल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. दि. ३१ मार्च राेजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास बावनथडी वितरिकेत अंदाजे दाेनवर्षीय नर वाघ मृतावस्थेत आढळला. सायंकाळ झाल्याने शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभूत कार्यपद्धतीनुसार करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार चिचाेली येथील शासकीय आगारात वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रसंगी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव नागपूर) यांचे प्रतिनिधी तथा मानद वन्यजीवरक्षक नदीम खान राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी शाहीद खान, साकाेलीचे पशुधन विकास अधिकारी डाॅ. गुणवंत भडके, डाॅ. विठ्ठल हटवार, डाॅ. पंकज कापगते, डाॅ. जितेंद्र गाेस्वामी, डाॅ. एस. सी. टेकाम, भंडाराचे उपवनसंरक्षक राहुल गवई, विभागीय वनअधिकारी (दक्षता) प्रीतमसिंग काेडापे, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी साकेत शेंडे, सहायक वनसंरक्षक यशवंत नागुलवार, नाकाडाेंगरीचे वनपरिक्षेत्राधिकारी, मनाेज माेहिते, फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेंढे उपस्थित हाेते. पंचांसमक्ष बाह्यतपासणी व शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी वाघाच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळून आल्या. वाघाच्या जबड्यातील खालील एक सुळा अर्धवट तुटलेल्या अवस्थेत आढळला. तसेच समाेरचा उजवा पाय सांध्यामधून निखळलेल्या अवस्थेत व डाव्या पायाचा पंजा जखमी हाेता.वाघाच्या चारीही पायांची नखे घासल्यामुळे झिजलेल्या अवस्थेत आढळल्याचे वनप्रशासनाचे म्हणणे आहे. तसेच उर्वरित अवयव शाबूत असल्याचे सांगण्यात आले.वाघाचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला, ते क्षेत्र पेंच व्याघ्रप्रकल्पाला जाेडणारा महत्त्वाचा वन्यप्राण्यांसाठी भ्रमणमार्ग आहे. मृत पावलेल्या वाघाचे वय दाेन वर्षांपेक्षा कमी असून स्वतंत्र अधिवासाच्या शाेधात असताना स्थानिक वाघांशी झालेल्या झटापटीत ताे गंभीर जखमी झाला असावा; तसेच उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाला. असा प्राथमिक अंदाजही यावेळी व्यक्त करण्यात आला.शवविच्छेदनानंतर वाघाच्या मृतदेहावर अंतिम दाहसंस्कार करण्यात आले. नाकाडाेंगरी वनपरिक्षेत्राधिकारी, सहायक वनसंरक्षक गडेगाव आगारचे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी तपास करीत आहेत.

शवविच्छेदनातील सत्य काही वेगळेच...- वैद्यकीय शवविच्छेदनात वाघाच्या मागील पायाची चार-चार नखे गायब आहेत. ती नखे कापण्यात आली आहेत. याशिवाय जबड्यातील एक सुळा दात ताेडलेला आहे. सापड्यामध्ये अडकलेला उजवा पाय तुटलेला हाेता. सापळा रचून या वाघाची शिकार केल्यानंतर नखे कापण्यात आली असावीत व त्यानंतर त्याचा मृतदेह वितरिकेत फेकूण देण्यात आला असे तथ्य बाहेर येत आहे. या वाघाची शिकार आहे, या बाबीला डाॅ. गुणवंत भडके यांनी दुजाेरा दिला.

 

टॅग्स :Tigerवाघ