शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

वाघोबाचे गावातूनच जंगलात पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:05 IST

नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सीतासावंगी गावालगत असलेल्या रेल्वेच्या जुन्या सदनिका परिसरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास ग्रामस्थांना वाघ दिसून आला.

ठळक मुद्देसीतासावंगीत वाघाचा ठिय्या : चार तासानंतर चिखला जंगलात मार्गक्रमण

आॅनलाईन लोकमतगोबरवाही/तुमसर : नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सीतासावंगी गावालगत असलेल्या रेल्वेच्या जुन्या सदनिका परिसरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास ग्रामस्थांना वाघ दिसून आला. ही वार्ता गावात पसरताच वाघाला बघण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. याची माहिती होताच वनविभागाचे पथक व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नागरिकांच्या ओरडण्याच्या आवाजामुळे हा वाघ गावातूनच जंगलाच्या दिशेने निघून गेला.मध्यप्रदेश-महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागात तीन ते चार वाघ आहेत. हे वाघ तुमसर तालुक्यातील जंगलव्याप्त परिसरात आले आहेत. पवनारखारी, सुंदरटोला, धनेगाव, चांदपूर व सीतासावंगीत या वाघाला अनेकांनी पाहिले आहे. परंतु हा वाघ नेमका कोणता? हे सांगता येणार नसल्याचे वनविभागाच्या कर्मचाºयांनी सांगितले.तुमसर तालुक्यातील या जंगलव्याप्त परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. या परिसरात वाघांची भटकंती सुरू असून जंगलव्याप्त परिसरात भीतीचे वातावरण आहे. वाघांचे नागरिकांना दररोज दर्शन होत आहे. यापूर्वी वाघांच्या हल्ल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. वनविभागाने याठिकाणी पिंजरा लावण्याची गरज आहे. वाघ दिसल्यावर वनविभागाचे अधिकारी ताफ्यासह येतात परंतु ठोस उपाययोजना करीत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सीतासावंगी येथे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद जोशी, एस.यु. मडावी यांच्यासह वनविभागाचा ताफा हजर होता.भेदरलेला वाघ अन् बघ्यांची गर्दीनागरिकांच्या गर्दीमुळे हा वाघ ५० मीटर अंतरातच दोन ते अडीच तास फिरत होता. एकीकडे वाघ आणि दुसरीकडे गर्दी असे चित्र होते. लोकांची गर्दी आणि ओरडण्याच्या आवाजाने हा वाघ भेदरलेला होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.सीतासावंगी येथील वाघाने चिखला परिसरातील जंगलात आश्रय घेतला आहे. वाघाच्या प्रत्येक हालचालीवर आमची नजर आहे.- अरविंद जोशी, वनपरिक्षेत्र अधिकारी, तुमसर.