शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पुलावर ‘बर्निंग व्हॅन’चा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:25 IST

वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलावर सुसाट वेगाने जाणाऱ्या मारोती व्हॅनला अचानक आग लागली.

चार जण बचावले : महामार्गावरील वाहतूक पाऊण तास ठप्पलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलावर सुसाट वेगाने जाणाऱ्या मारोती व्हॅनला अचानक आग लागली. धावत्या वाहनाने पेट घेतल्याची बाब लक्षात येताच चालकाने वाहन थांबविल्याने वाहनातील चार जण सुदैवाने बचावले. ही घटना सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडली.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील वैनगंगा नदीच्या विस्तीर्ण पात्रात उभारलेल्या पुलावर धावत्या वाहनाने पेट घेतल्याची माहिती होताच जिल्हा पोलीस प्रशासनाने याची दखल घेत महामार्गावरील वाहतूक अर्धा कि.मी. आधीच थांबविली. तसेच अग्नीशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आली. मारोती व्हॅन टायरसह जळून खाक झाल्याने वाहनाचे नंबर मिळू शकले नाही. तसेच वाहनातील चारही जण किरकोळ जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ पाठविल्याची प्राथमिक माहिती आहे. महामार्गावरील वाहतूक अर्ध्या तासापर्यंत प्रभावित झाली होती. सदर जळालेल्या वाहनात सिलिंडरचा उपयोग करण्यात आला असावा असा कयासही यावेळी व्यक्त करण्यात आला. दरम्यान वाहनाला आग कशामुळे लागली याची नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.