शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर फेकले दूध, भाजीपाला, धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 22:39 IST

सरकारच्या ओबीसी व शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करीत शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवित रविवारला सकाळी करडी परिसरातील शेतकऱ्यांनी देव्हाडा व नरसिंगटोला मार्गावर दूध, भाजीपाला, टरबूज, काकडी व धान्य फेकून असंतोष व्यक्त केला.

ठळक मुद्देसंपाला पाठिंबा : शेतकऱ्यांनी नोंदविला शासनाचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : सरकारच्या ओबीसी व शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करीत शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवित रविवारला सकाळी करडी परिसरातील शेतकऱ्यांनी देव्हाडा व नरसिंगटोला मार्गावर दूध, भाजीपाला, टरबूज, काकडी व धान्य फेकून असंतोष व्यक्त केला. दरम्यान, या मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना भाजीपाला व दूधाचे मोफत वितरण करून भारत माता की जय, जय जवान-मेला किसान’ चा नवा नारा देण्यात आला.मोहाडी तालुक्यातील करडी परिसरातील देव्हाडा, नरसिंगटोला, निलज, मोहगाव, नवेगाव, करडी, जांभोरा, लेंडेझरी, किसनपूर, पालोरा, खडकी, मुंढरी, पांजरा, बोरगाव, ढिवरवाडा येथील शेतकऱ्यांनी देव्हाडा येथे तुमसर ते गोंदिया मार्गावर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी निषेध आंदोलन केले. भाजपा सरकारचे धोरण हे भांडवलदारांच्या हिताचे असून शेतकरी व शेतमजूरांना गुलाम बनविण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला. यावेळी शेतकऱ्यांनी पंतप्रधानांनी दिलेल्या आश्वासनानुसार ऊस, धान, कापूस व अन्य शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्के नफ्यासह हमी भाव देण्यात यावा. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, दूधाचे व शेतमालाचे पडलेले भाव वाढविण्यात यावे. खते, किटकनाशके, पशुखाद्यांचे दर कमी करण्यात यावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात यावे, कृषीपंपाचे बिल माफ करावे, शेतकरी व शेतीविरोधी धोरणे बंद करावी. जिल्ह्याला दुष्काळाचा लाभ देण्यात यावा, तुडतुडा, मावा, किडीमुळे झालेल्या नुकसानीसाठी दिलेली मदत तोंडाला पाने पुसणारी असून ८० टक्के शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहे. मागील वर्षी करडी परिसरात ३७ टक्के रोवणी होऊन ६३ टक्के क्षेत्र पडीत राहिले. रोवणीविणा पडीत शेतीची नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांना खाजगी पीक विमा देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आले. आंदोलनादरम्यान काही वेळ वाहतूक ठप्प राहिली. आंदोलन मागे घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.या आंदोलनात चुन्नीलाल माटे, सुधीर बांते, जालंदर गाढवे, सुरेंद्र गाढवे, शंकर डोळस, शैलेश कांबळे, तेजराम माटे, योगेश्वर गाढवे, दिनेश गाढवे, राजेश गाढवे, मारोती गाढवे, गुरुदेव बुध्दे, विलास गाढवे, लक्ष्मण धोटे, प्रदिप कावळे, मंगेश साठवणे, संजय साठवणे, अन्ना राखडे, रामभाऊ नेरकर, गुड्डू कांबळे, संतोष पचघरे, सुर्यभान बोंदरे, जागेश्वर बोंदरे, जयराम बोंदरे, रामकृष्ण कुकडे यांच्यासह परिसरातील शेतकरी सहभागी होते.