लाखांदूर/आसगाव : तालुक्यातील दोनाड शेतशिवारात रानडुकराच्या हल्ल्यात तीन२२२ महिला जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.दोनाड येथील यादोराव अंतराम आंबोणे यांच्या शेतावर मजूरीवर असताना गोपिका नामदेव चोपकार (७०) वर्षे हिच्यावर हल्ल चढवला. त्यात ती गंभीर जखमी झाली. शेजारच्या शेतातील लोक धावून आल्याने प्राण वाचले. ही घटना १९ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता घडली तर रोहणी येथील प्रमिला बक्षी भुते (५०) वर्षे ही स्वत:च्या शेतात काम करीत असताना रानडुकराने हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. किन्ही गुंडेपार येथील शोभा रामदास दाणी व रंजना रंगारी याही रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. दोन्ही घटनेतील चारही महिला उपचार घेत आहेत तरी शासनाने त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी जनतेनी केली आहे. रानडुकराने एकाच आठवड्यात चार महिलांना जखमी केल्याने महिला मजुरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.आसगाव येथून जवळच असलेल्या मोहरी चौ. येथील लक्ष्मी तुकाराम हेमणे (५८) या स्वत:च्या शेतात काम करीत असतांना रानडुकरांनी त्यांच्यावर हल्ला केला यात त्या जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजता घडली. (शहर प्रतिनिधी/वार्ताहर)
रानडुकराच्या हल्ल्यात तीन महिला जखमी
By admin | Updated: February 23, 2015 01:02 IST