शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

लांडग्याच्या हल्ल्यात तीन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 22:20 IST

शेतात काम करणाऱ्या दोन महिलांसह तिघांवर लांडग्याने हल्ला करण्याची घटना तालुक्यातील पिंडकेपार येथे शुक्रवारी सकाळी घडली. गुरूवारी एका वृद्ध महिलेला जखमी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लांडग्याने हल्ला केल्याने शेतकऱ्यात भितीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देपिंडकेपारची घटना : साकोली तालुक्यात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : शेतात काम करणाऱ्या दोन महिलांसह तिघांवर लांडग्याने हल्ला करण्याची घटना तालुक्यातील पिंडकेपार येथे शुक्रवारी सकाळी घडली. गुरूवारी एका वृद्ध महिलेला जखमी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लांडग्याने हल्ला केल्याने शेतकऱ्यात भितीचे वातावरण पसरले आहे.शिलाबाई दामोधर उके (४०), सरस्वती बाळकृष्ण गजबे (६०), खेमराज सुखराम मडावी (२५) तिघे रा. पिंडकेपार अशी गंभीर जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. शुक्रवारी सकाळी तिघेही जण शेतात काम करीत होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या लांडग्याने शिलाबाईवर अचानक हल्ला केला. त्यामुळे तिने आरडा ओरडा करताच बाजुच्या शेतात काम करीत असलेले खेमराज आणि सरस्वती दोघेही मदतीसाठी धावून आले. मात्र या लांडग्याने त्या दोघावरही हल्ला केला. हा प्रकार इतर शेतकºयांना माहित होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ साकोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपेश बडवाईक यांनी उपचार केले. पुढील उपचारासाठी भंडारा येथे रवाना करण्यात आले.गुरूवारी एका ६० वर्षीय वृद्ध महिलेवर लांडग्याने हल्ला करण्याची घटना घडली होती. शुक्रवारी पुन्हा लांडग्याने हल्ला केल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. यामुळे शेतात जाण्यास मजूर आणि शेतकरीही घाबरत आहे. सध्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी शेतात तळ ठोकून आहे. मात्र लांडग्याची दहशत आहे. लांडग्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहे.