शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

तीन दरोडेखोर गजाआड

By admin | Updated: June 3, 2014 23:50 IST

भरदिवसा दरोडेखोरांनी एका इसमाला मारहाण करून लुटले. याची माहिती कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना देण्यात आली. पोलिसांच्या कर्तव्यदक्षपणामुळे अनेक दिवसांपासून लोकांना लुटणारे दरोडेखोर गवसले.

पोलिसांची सतर्कता : सिनेस्टाईल पाठलाग, तिघांनाही नागपूर दवाखान्यात हलविलेवरठी  : भरदिवसा दरोडेखोरांनी एका इसमाला मारहाण करून लुटले. याची माहिती कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना देण्यात आली. पोलिसांच्या कर्तव्यदक्षपणामुळे अनेक दिवसांपासून लोकांना लुटणारे दरोडेखोर गवसले. यात एकनाथ देशभ्रतार (२५), सोनू गजभिये (२५) रा.कामठी व अविनाश काळे रा.नागपूर यांच्यावर भादंवि ३९२ व ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  तीनही दरोडेखोर जखमी असल्याने त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे. दरोडेखोर हे कामठी व नागपूर येथील रहिवासी असल्याचे समजते.भ्रमणध्वनीवर मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन पोलिसांनी आपली दुचाकी त्या दिशेने वळविली. योगायोगाने तीन युवक दुचाकीने पळताना दिसले. त्यांना हटकण्यात आले. पण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्यांनी बेभान वेगाने दुचाकी हाणली. कुठलीही पर्वा न करता पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. पोलिसांना चकमा देण्यासाठी सुसाट धावणारी चोरांची दुचाकी झाडावर आदळली व ते पडले. त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांपासून सुटका करण्यासाठी त्यांनी ऑटो रिक्शा गाठले. पण ते सुटका करू शकले नाही. समोरून येणार्‍या पोलिसांना ते दिसले व त्यांना अखेर जेरबंद व्हावे लागले. ही चित्रपटातील कथानकाला शोभणारी घटना काल दुपारी खुश्रीपार सातोना या मार्गावर घडली. खुश्रीपार सातोना रस्त्यावरून नेरीचे मधुकर मते हे स्वगावी जात होते. दरम्यान भंडारा पासून पाठलाग करीत तीन युवकांनी त्यांच्या दुचाकीजवळ येऊन अंगावर थुंकले. यावेळी मधुकर मते यांनी गाडी थांबविली. याचा फायदा घेऊन त्यांनी त्याला अडविले. त्यांच्या खिशातील बँकेची पुस्तक व वरच्या खिशातील एक हजार रुपये जबरन हिसकाविले. याला विरोध करत असताना दरोडेखोरांनी त्यांना मारहाण केली व मते यांच्या दुचाकीची चाबी घेऊन खात मार्गाने पसार झाले. गत काही महिन्यांपासून भंडारा जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या गावात दरोडेखोरांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानुसार पोलीस अधीक्षक भंडारा यांनी या भागात वरठी आऊटपोस्टचे पोलीस हवालदार विजय पंचबुद्धे व महादेव वंजारी यांची ड्युटी लावली आहे. घटनेच्या दिवशी मधुकर मते यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार भ्रमणध्वनीने गावात सांगीतला. वेळ न गमवता एका इसमाने हवालदार महादेव वंजारी यांच्या भ्रमणध्वनीवर माहिती दिली. भ्रमणध्वनीवर माहिती मिळताच विजय पंचबुद्धे व महादेव वंजारी यांनी दरोडेखोरांच्या दिशेने मोर्चा वळविला. दरम्यान, त्यांना सी.बी.झेड. एम.एच. ४0 जे १७२२ या सी.बी.झेड. नावाच्या दुचाकीवर तीन युवक जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले व अडविण्याचा प्रयत्न केला. पण ते पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला. सुसाट वेगाने पळून जाण्याच्या नादात त्यांची दुचाकी झाडावर आदळली व ते जखमी झाले. त्या अवस्थेत त्यांनी रस्त्यावरून जाणार्‍या ऑटोरिक्षाला अडवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, समोरून येणार्‍या पोलिसांनी त्यांना पकडले. तपास पोलीस निरीक्षक राखडे व सहायक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम गभणे करीत आहेत. (वार्ताहर)