शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तीन अपघातात तीन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:18 IST

जिल्ह्यात मागील १२ तासात घडलेल्या तीन अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला. मृतांमध्ये एका सहा वर्षीय बालकाचा समावेश आहे. ही घटना मोहाडी तालुक्यातील दहेगाव, दुसरी घटना मुजबी येथे तर तिसरी घटना कारधा टोल नाका येथे घडली.

ठळक मुद्देएक गंभीर : दहेगाव, मुजबी व कारधा टोल नाक्यावरील घटना, मृतांमध्ये सहा वर्षीय बालकाचा समावेश

आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्ह्यात मागील १२ तासात घडलेल्या तीन अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला. मृतांमध्ये एका सहा वर्षीय बालकाचा समावेश आहे. ही घटना मोहाडी तालुक्यातील दहेगाव, दुसरी घटना मुजबी येथे तर तिसरी घटना कारधा टोल नाका येथे घडली.मोहाडी : जवळील दहेगाव येथे मोरगाव अर्जुनी येथील सुभाष सूर्यकांत उपरीकर हा सहा वर्षीय बालक रस्ता ओलांडत असताना बोलेरो वाहनाच्या तावडीत सापडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.मोरगाव अर्जुनी येथील सूर्यकांत उपरीकर हे आपल्या मुलाचा नवस फेडण्यासाठी दहेगाव (मोहाडी) येथील पाटील देव मंदिरात आले होते. त्यांचा ६ वर्षीय मुलगा सुभाष याचा नवस फेडला. नंतर रस्त्याच्या पलिकडील शाळेत जेवणाचा कार्यक्रम होता.आजोबा समोरील दुकानात गेले असता हा मुलगा आजोबाकडे गेला व नजर चुकवून मंदिराकडे रस्ता ओलांडून येत असताना राज्य मार्गावरून भरधाव येणाऱ्या बोलेरो पिकअपच्या गाडीखाली आला. यातच या बालकाचा करुण अंत झाला. वाहन क्रमांक एम.एच. २९ टी ६८९२ चा चालक आरोपी महेश ताराचंद शहारे (२७) रा.महालगाव ता.तुमसर याला अटक करण्यात आली आहे. या वाहनातून ५ बैलांना देव्हाडा येथून जवाहरनगर येथे नेण्यात येत होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार जगन्नाथ गिरीपुंजे, मिथून चांदेवार करीत आहेत.अपघातात महिला ठारभंडारा : कारधा टोल नाका येथे दुचाकी तथा चारचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. वृत्त लिहिपर्यंत कारधा पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल झाली होती. मृत महिलेचे नाव कळू शकले नाही. अपघातानंतर मात्र टोल परिसरात वाहनांची रांग तथा परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.