शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लुटण्याचा प्रयत्नात तिघांवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:56 IST

मंडप पूजन कार्यक्रमात सहभाग होण्यासाठी जाणाऱ्या तीन इसमांवर प्राणघातक हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास महालगाव शिवारात घडली.

ठळक मुद्देमहालगाव शिवारातील घटना : परिसरात दहशतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : मंडप पूजन कार्यक्रमात सहभाग होण्यासाठी जाणाऱ्या तीन इसमांवर प्राणघातक हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास महालगाव शिवारात घडली. नंदराम बघेले (७०), लक्ष्मण कटरे (४०) आणि जियालाल बघेले (६५) रा. बिनाखी अस्शी जखमींची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.वारपिंडकेपार येथील ललीत पटले यांच्या घरी विवाह समारंभाचे आयोजन होते. यानिमित्त नंदराम बघेले, लक्ष्मण कटरे आणि जियालाल बघेले हे तिघेही एकाच दुचाकीने रात्री ९ वाजताच्या सुमारास घरून निघाले. या तिघांनी बिनाखी ते महालगाव मार्गाने जाण्याचा बेत आखला. या मार्गाने गेल्यास वारपिंडकेपार गावचे अंतर कमी आहे. या मार्गाने जात असताना महालगाव गावाच्या हद्दीत या तिघांना अज्ञात आरोपींनी अडविले. लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. हल्लेखोरांनी पैशाची मागणी करीत त्यांच्याकडील साहित्य तपासले. परंतु या तिघांकडे पैसे नव्हते. वाद्यवृंद साहित्याची तोडफोड केली. हल्लेखोरांचा संवाद हिंदी भाषेत होता. मारहणीनंतर जखमींना त्यांनी जाण्यास सांगितले. जखमी अवस्थेत ते वारपिंडकेपार गावाकडे न जाता त्यांनी थेट बिनाखी गाव गाठले. गावकऱ्यांना त्यांनी घटनेची माहिती दिली. गावकऱ्यांनी पुन्हा घटनास्थळा गाठले. परंतू हल्लेखोरांचा सुगावा लागला नाही. या घटनेत लक्ष्मण कटरे यांचे डोक्याला जखम झाली आहे. तर अन्य नंदराम आणि जियालाल यांच्या पायाला दुखापत झाली आहे. अंधार असल्याने हल्लेखोरांची ओळख पटली नाही. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सिहोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात भादंविच्या ३४१, ३९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.