शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 12:57 IST

Bhandara : मानधन मिळण्यासाठी आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. परिणामी त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळले आहे. अशा स्थितीत त्यांना तत्काळ मानधन देऊन अन्य समस्याही मार्गी लावाव्यात, अशी मागणी केली आहे. या आशयाचे निवेदन आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीआयटीयु) भंडारा जिल्ह्याच्यावतीने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले.

या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे आशा सेविका व गटप्रवर्तक हे भारतातील व राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महत्त्वाच्या दुवा मानले जातात. नागरिकांना आरोग्यसेवा त्यांच्या घरापर्यंत उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम आशा व गटप्रवर्तक कर्मचारी इमानेइतबारे करत आहेत. कोरोना काळात त्यांच्या कामामुळे कोरोनाला हद्दपार करण्यात यश मिळवले. त्यामुळे आशा सेविका व गटप्रवर्तक यांना नावलौकिक मिळाला. त्यांच्या कामाचा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननेसुद्धा सन्मान केला आहे. परंतु, त्यांच्या समस्यांची जाण शासनाने अजूनपर्यंत घेतलेली नाही. शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे आजही त्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. 

शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळण्याकरिता आशा व गटप्रवर्तक कर्मचारी सतत संघर्ष करत आहेत. आशा सेविका व गटप्रवर्तक यांनी १८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत आंदोलन केल्यानंतर शासनाने मागण्या मंजूर केल्या होत्या. यात आशा सेविकांना सात हजार रुपये तर गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मासिक वेतनात वाढ व गटप्रवर्तकांचे कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये समायोजन करण्याबाबत कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. याशिवाय या कर्मचाऱ्यांना दोन हजार रुपये दिवाळी बोनस, आरोग्यवर्धिनीचा निधी सर्व आशांना मेडिकल ऑफिसर यांच्या स्वाक्षरीने देणार, आरोग्यवर्धिनीचा १५०० रुपये मोबदला महिना गटप्रवर्तकांना देण्याचीही घोषित केले होते. अशा विविध मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. परंतु, त्यांची अंमलबजावणी करण्यात न आल्याने ५० दिवस बेमुदत संपही पुकारण्यात आला होता.

उल्लेखनीय म्हणजे आशा सेविकांना पाच हजार रुपये महिना व गटप्रवर्तकांना एक हजार रुपये महिना नोव्हेंबर २०२३ पासून देण्याच्या निर्णय शासनाने घेतला. परंतु, नवीन जीआरनुसार मानधन एप्रिल २०२४ पासून देण्याचे पत्र पाठविण्यात आले आहे. शासनाने निर्णय घेताना कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. परिणामी घेतलेला निर्णय अयोग्य असून, त्यामध्ये फेरबदल करून ९ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, अशी मागणी केली आहे. हे निवेदन देताना उषा मेश्राम, सुनंदा बसेशंकर, माधुरी डोंगरे, वैशाली तांडेकर, वनिता तितिरमारे, ममता चवरे, स्वाती रूपाली, संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र साठे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

"आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत कर्मचारी युनियन गंभीर आहे. शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही उग्र आंदोलन करू. परंतु, आम्ही आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मागे हटणार नाही. त्यासाठी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन लढत राहणार आहे."- उषा मेश्राम, महासचिव आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन, भंडारा. 

 

टॅग्स :bhandara-acभंडारा