शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख 47 हजार तरुणांनी घेतली काेराेना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 05:00 IST

जागतिक स्तरावर तिसरी लाट सुरु झाली आहे. आपल्या देशातही तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. काेराेना लसीकरण झालेल्यांची बाधित हाेण्याची शक्यता ३० टक्याने खाली आली आहे. तर मृत्यू हाेण्याचे प्रमाण ९५ टक्केपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे लस घेणे आवश्यक झाले आहे. त्यातही तरुणांनी लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने पुढे आले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काेराेना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्याही लाटेत सर्वाधिक रुग्ण  १८ ते ४४ वयाेगटातीलच हाेते. आता संभाव्य तिसरी लाट येत असल्याने या वयाेगटाचे लसीकरण माेठ्या प्रमाणात करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने घेतले आहे. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत १८ ते ४४ वयाेगटातील ३ लाख ४७ हजार १४५ व्यक्तींनी काेराेना लस घेतली आहे. मात्र ज्येष्ठांच्या तुलनेत आजही ही संख्या कमी आहे.काेराेना आजाराचा सामना करण्यासाठी लस हाच एकमेव उपाय आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने माेठ्या प्रमाणात काेराेना लसीकरण सुरु आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पहिला डाेस घेणाऱ्यांची संख्या ६ लाख ६२ हजार ८३४ तर दुसरा डाेस १ लाख ८६ हजार ४६४ व्यक्तींनी घेतला आहे. पहिला आणि दुसरा डाेस घेणाऱ्यांची संख्या आता ८ लाख ४९ हजार २९८ झाली आहे. त्यात १८ ते ४४ वयाेगटातील तीन लाख ४७ हजार १४५ तर ४५ वर्षावरील ५ लाख १ हजार ७० व्यक्तींनी काेराेना लस घेतली आहे.जिल्ह्यात लसीकरणासाठी ९ लाख ६५ हजार व्यक्ती पात्र आहेत. दुसऱ्या लाटेच्या दरम्यान ग्रामीण भागात काेराेना लसीकरणाबाबत माेठ्या प्रमाणात गैरसमज हाेते. अनेकजण काेराेना लस घेण्यासाठी तयार हाेत नव्हते. मात्र जिल्हा प्रशासनाने व्यापक जनजागृती माेहिम राबवून गैरसमज दूर केले. आता जिल्ह्यात वेगाने लसीकरण सुरु आहे. गावागावांत लसीकरणासाठी शिबिरांचे आयाेजन करण्यात येत आहे. नागरिकांचा तेवढाच उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे.जागतिक स्तरावर तिसरी लाट सुरु झाली आहे. आपल्या देशातही तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. काेराेना लसीकरण झालेल्यांची बाधित हाेण्याची शक्यता ३० टक्याने खाली आली आहे. तर मृत्यू हाेण्याचे प्रमाण ९५ टक्केपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे लस घेणे आवश्यक झाले आहे. त्यातही तरुणांनी लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने पुढे आले आहे.जिल्ह्यात लसीचा मुबलक साठा उपलब्ध असून लसीकरणासाठी शहरी व ग्रामीण भागात शिबिर लावण्यात येत असल्याची माहिती आराेग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.

लसीकरणात महिलाच आघाडीवर- भंडारा जिल्ह्यात लसीकरणात महिला आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. चार लाख २८ हजार २१५ महिलांनी लस घेतली असून चार लाख २० हजार ९७८ पुरुषानी लस घेतली आहे. विशेष म्हणजे महिलांपेक्षा काेराेनाबाधितांचे प्रमाण पुरुषांमध्ये दिसून आले हाेते. त्यानंतरही पुरुष लस घेण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.

पाच लाख ज्येष्ठ नागरिकांनी घेतली लस- जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख एक हजार ७० ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली आहे. ४५ वर्ष वयाेगटातील ही मंडळी आहे. काेराेना लसीकरणात याच वयाेगटातील सर्वाधिक नागरिकांचे लसीकरण झाल्याचे भंडारा जिल्ह्यात दिसून येत आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या