शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख ४७ हजार तरुणांनी घेतली काेराेना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:42 IST

काेराेना आजाराचा सामना करण्यासाठी लस हाच एकमेव उपाय आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने माेठ्या प्रमाणात काेराेना लसीकरण सुरु आहे. आतापर्यंत ...

काेराेना आजाराचा सामना करण्यासाठी लस हाच एकमेव उपाय आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने माेठ्या प्रमाणात काेराेना लसीकरण सुरु आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पहिला डाेस घेणाऱ्यांची संख्या ६ लाख ६२ हजार ८३४ तर दुसरा डाेस १ लाख ८६ हजार ४६४ व्यक्तींनी घेतला आहे. पहिला आणि दुसरा डाेस घेणाऱ्यांची संख्या आता ८ लाख ४९ हजार २९८ झाली आहे. त्यात १८ ते ४४ वयाेगटातील तीन लाख ४७ हजार १४५ तर ४५ वर्षावरील ५ लाख १ हजार ७० व्यक्तींनी काेराेना लस घेतली आहे.

जिल्ह्यात लसीकरणासाठी ९ लाख ६५ हजार व्यक्ती पात्र आहेत. दुसऱ्या लाटेच्या दरम्यान ग्रामीण भागात काेराेना लसीकरणाबाबत माेठ्या प्रमाणात गैरसमज हाेते. अनेकजण काेराेना लस घेण्यासाठी तयार हाेत नव्हते. मात्र जिल्हा प्रशासनाने व्यापक जनजागृती माेहिम राबवून गैरसमज दूर केले. आता जिल्ह्यात वेगाने लसीकरण सुरु आहे. गावागावांत लसीकरणासाठी शिबिरांचे आयाेजन करण्यात येत आहे. नागरिकांचा तेवढाच उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे.

जागतिक स्तरावर तिसरी लाट सुरु झाली आहे. आपल्या देशातही तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. काेराेना लसीकरण झालेल्यांची बाधित हाेण्याची शक्यता ३० टक्याने खाली आली आहे. तर मृत्यू हाेण्याचे प्रमाण ९५ टक्केपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे लस घेणे आवश्यक झाले आहे. त्यातही तरुणांनी लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने पुढे आले आहे.

जिल्ह्यात लसीचा मुबलक साठा उपलब्ध असून लसीकरणासाठी शहरी व ग्रामीण भागात शिबिर लावण्यात येत असल्याची माहिती आराेग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.

बॉक्स

लसीकरणात महिलाच आघाडीवर

भंडारा जिल्ह्यात लसीकरणात महिला आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. चार लाख २८ हजार २१५ महिलांनी लस घेतली असून चार लाख २० हजार ९७८ पुरुषानी लस घेतली आहे. विशेष म्हणजे महिलांपेक्षा काेराेनाबाधितांचे प्रमाण पुरुषांमध्ये दिसून आले हाेते. त्यानंतरही पुरुष लस घेण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.

बॉक्स

पाच लाख ज्येष्ठ नागरिकांनी घेतली लस

जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख एक हजार ७० ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली आहे. ४५ वर्ष वयाेगटातील ही मंडळी आहे. काेराेना लसीकरणात याच वयाेगटातील सर्वाधिक नागरिकांचे लसीकरण झाल्याचे भंडारा जिल्ह्यात दिसून येत आहे.