शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

विविध अपघातांत तीन ठार

By admin | Updated: February 28, 2015 00:53 IST

लाखनी तालुक्यात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. यातील एका अपघातात बसने लाखोरी जवळ दुचाकीस्वाराला धडक दिली.

लाखनी/पालांदूर : लाखनी तालुक्यात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. यातील एका अपघातात बसने लाखोरी जवळ दुचाकीस्वाराला धडक दिली. दुसऱ्या अपघात केसलवाडा फाट्याजवळ तर पालांदूर जवळील देवरीगोंदी फाट्याजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.लाखनी : शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास फिरायला गेलेल्या मुरमाडी येथील सोमेश्वर दौलत घेटुले (४०) यांचा केसलवाडा फाट्यावर तर बसचा धडकेत बाम्पेवाडाजवळ केवळराम मेश्राम यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. सोमेश्वर चेटूले यांचा किराणा व्यवसाय आहे. नित्याप्रमाणे ते श्रीराम वासनिक यांच्यासह पहाटे फिरायला गेले. दरम्यान साकोलीकडून भंडाऱ्याकडे जाणाऱ्या भरधाव वेगाने त्यांना जबर धडक दिली. यात सोमेश्वर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर श्रीराम वासनिक हे जखमी झाले. अपघाताची माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमी वासनिक यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अत्यवस्त असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सहा. पोलिस निरीक्षक सोनटक्के, श्रीकांत मस्के, संतोष चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञान वाहनचालकाविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. तर अन्य एका अपघातात एसटी बसच्या धडकेत लाखोरी जवळ केवळराम कुकटू मेश्राम यांचा मृत्यू तर खलील आमीर शेख हे जखमी झाल्याची घटना आहे.तुमसरकडून पालांदूरकडे जाणाऱ्या तुमसर आगाराची बस ही लाखनीकडून मोटारसायकलने बाम्पेवाडाकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत हा अपघात झाला. केवळराम मेश्राम हे बाम्पेवाडा येथील महात्मा गांधी हायस्कूल येथे कार्यरत आहेत. ते लाखनीवरुन बाम्पेवाडाकडे खलील आमीर शेख यांच्या मोटार सायकल क्रमांक एम एच ४९ ए १९३२ ने जात होते. दरम्यान तुमसर येथून पालांदूरकडे जाणारी तुमसर आगाराची बस क्रमांक एम एच ४० एन ९९८९ ची दुचाकीला जबर धडक बसली. या अपघातात दुचाकस्वार रस्त्यावर कोसळले. यावेळी केवळराम मेश्राम यांच्या अंगावरुन बसची चाके गेल्याने त्यांचा चेहरा चेंदामेंदा झाला. तर शेख हा जबर जखमी झाला. अपघाताची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे नागरिकांमध्ये काळी काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी लाखनीचे ठाणेदार जयंत चव्हाण उपनिरीक्षक दिपक वानखेडे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. बसचालकाविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पालांदूर : पालांदूर अड्याळ मार्गावरुन एका दुचाकीने तिर्रीला जाणाऱ्या दुचाकीस्वाराला भरधाव ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३६ डी ९३७८ ने धडक दिली. हा अपघात अड्याळ मार्गावरील देवरीगोंदी येथे गुरुवारी सांयकाळी ४ वाजताचा सुमारास घडला. यात दुचाकीवरील शारदा खुशाल नागोसे (४५) रा. तिर्री यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील अन्य दोघे गंभीर जखमी झाले. वळणावर ट्रॅक्टरची धडक लागल्याने हा अपघात घडला. याप्रकरणी खुशाल नागोसे यांच्या तक्रारीवरुन पालांदूर पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. (शहर प्रतिनिधी/वार्ताहर)