शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्स-मॅक्स वाहनाच्या धडकेत तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 22:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ट्रॅव्हल्स व मॅक्स वाहनात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात मॅक्सचालकासह तीन जण ठार झाले. ही घटना मिटेवानी- मेहगाव दरम्यानच्या वळणावर रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. दिनेश चौधरी (४२) (मॅक्सचालक) रा.डोंगरी बु., प्रवासी कुसुम पृथ्वीराम सरोदे (५६) रा.कुरमुडा व प्रकाश गोन्नाडे (३३) रा.पवनारा अशी मृतांची नावे आहेत. ...

ठळक मुद्दे१३ प्रवासी गंभीर जखमी : मिटेवानी-मेहगाव शिवारातील घटना, जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ट्रॅव्हल्स व मॅक्स वाहनात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात मॅक्सचालकासह तीन जण ठार झाले. ही घटना मिटेवानी- मेहगाव दरम्यानच्या वळणावर रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. दिनेश चौधरी (४२) (मॅक्सचालक) रा.डोंगरी बु., प्रवासी कुसुम पृथ्वीराम सरोदे (५६) रा.कुरमुडा व प्रकाश गोन्नाडे (३३) रा.पवनारा अशी मृतांची नावे आहेत. ओव्हरटेक करताना ही घटना असून यात १३ प्रवासी गंभीर जखमी झाले.तिरोडी येथील वऱ्हाडी तुमसर येथे मुस्लीम समुदायातील सामूहिक विवाह सोहळ्यानिमित्त मॅक्स क्रमांक एम.एच. ३१ ए.एच. ४१९३ ने येत होते. विरुद्ध दिेशेने जाणारी ट्रॅव्हल्स क्रमांक एम.पी. ५० बी ०२१८ तिरोडी येथे जात होती. मिटेवानी - मेहगाव वळणावर एका कमांडरला ओव्हरटेक करताना प्रवासी मॅक्स व ट्रॅव्हल्स यांच्यात आमोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की मॅक्स सुमारे ४०० फूटांपर्यंत फरफटत गेली. धडकेत ट्रॅव्हल्स अनियंत्रित होवून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. यात ट्रॅव्हल्समधील प्रवाशी गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी प्रवाशांमध्ये ग्यानीराब बर्वे (७०) रा.बाळापूर, कमला पुष्पतोडे (५०) कुरमुडा, सुमत्रा बर्वे (४५) रा.बाळापूर, गायत्री धनराज मलघाटी (४५), रा.बाळापूर, रिता शाहू (४)रायपूर (छत्तीसगड) यांना भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले.उर्वरीत जखमी हलीमा बी. (७०) तिरोडी, सैय्यदा बी (७५) रा.तिरोडी, हसीना पठाण (४०) रा.गोंदिया, दिलीप उके (३०) रा.तिरोडी, भोजराज गुर्वे (४८) रा.बळपाणी, शकीला खान (४०) तिरोडी, अजीजा बी (६५) रा.तिरोडा, रिजवाना शेख (३०) तिरोडी यांच्यावर तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.अपघातानंतर जि.प.चे माजी सदस्य सुरेश राहांगडाले यांच्यासह सरपंच तथा तुमसर येथून मुस्लिम समाजबांधवांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना तुमसर येथे उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. तुमसर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास पोलीस उपनिरीक्षक म्हैसकर करीत आहे.तुमसर नाकाडोंगरीसह तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भरधाव वाहनामुळे अपघात येथे घडत आहेत. दोन दिवसापूर्वीच खापा चौकात टिप्परने एका तरूणाचा जीव घेतला.