शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

बोदरा येथे तीन शिकारी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 22:33 IST

तालुक्यात शिकारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून या शिकारीमुळे वन्यप्राण्यांची संख्या रोडावत आहे. साकोली तालुक्यातील बोदरा येथे बुधवारी पहाटे वीज प्रवाहाच्या सहाय्याने एका रानडुकराची शिकार करण्यात आली. या शिकारीची माहिती मिळताच वनक्षेत्राधिकारी आरती उईके यांनी सापळा रचून तीन शिकाऱ्यांना जेरबंद केले.

ठळक मुद्देवनविभागाची कारवाई : विजेच्या प्रवाहाने रानडुकराची शिकार

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यात शिकारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून या शिकारीमुळे वन्यप्राण्यांची संख्या रोडावत आहे. साकोली तालुक्यातील बोदरा येथे बुधवारी पहाटे वीज प्रवाहाच्या सहाय्याने एका रानडुकराची शिकार करण्यात आली. या शिकारीची माहिती मिळताच वनक्षेत्राधिकारी आरती उईके यांनी सापळा रचून तीन शिकाऱ्यांना जेरबंद केले.दशरथ संपत भोंडे (४५), देवराम भिवाजी चांदेकर (५९), भागवत कडू मेश्राम (४६) तिघेही रा.बोधरा अशी अटकेतील शिकाºयांची नावे आहेत. लाखनी वन विभागाअंतर्गत साकोली तालुक्यातील बोधरा येथे तिघांनी जंगलाजवळ नाल्यावर वीज प्रवाह लावून एका रानडुकराची शिकार केली. शिकारीनंतर सदर रानडुकराच्या मांसाची त्याच ठिकाणी विक्री करण्यात आली काही मांस शिकाºयाने स्वत:साठी घरी घेऊन गेले. या शिकारीची माहिती वनक्षेत्राधिकारी आरती उईके यांना मिळाली. यांनी तात्काळ या शिकाऱ्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. अवघ्या काही तासातच शिकाºयांना पकडून त्यांना वनकार्यालय साकोली येथे आणून कायदेशिर कारवाई केली.पकडण्यात आलेल्या शिकाऱ्यांजवळ रानडुकराचे मांस, शिकारीसाठी लागणारे साहित्य व शिजविण्यासाठी वापरण्यात आलेले भांडे असे साहित्य जप्त करण्यात आले. वनविभागाने पकडलेल्या धाडीत मात्र रानडुकराचे शीर सापडलेले नाही. मात्र सदर मांस हे रान डुकराचेच आहे हे पशुवैद्यकीय अधिकाºयांकडूच निश्चित करण्यात आले. सदर कारवाई वनक्षेत्राकिारी आरती उईके, क्षेत्र सहाय्यक वाय.एस. तांडेकर, वनरक्षक एन.एस. हटवार, आर.बी. पडोळे, क्षेत्र सहाय्यक आर.बी. धोटे, वनपाल आर.एस. साखरे, के.एम. जांभुळकर, वनरक्षक बी.एम. बोपचे, वनमजूर जी.एस. तुपट, डब्लू.एन. बोळणे, धारणे, वाहन चालक डी.जी. धोंडे यांनी केली आहे.