सालई येथील घटना : तीन लाखांचे नुकसानलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : सालई (बुज) येथे शनिवारला दुपारी तीन घरे व एका गोठ्याला अचानक आग लागली. त्यात दोन घरे पूर्णत: जळून खाक झाली. एक घर अंशत: जळाले तर गोठ्यातील पशुखाद्य जळाल्याने त्या कुटुंबीयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोहाडी तालुक्यातील सालई येथील बंडू हरी वंजारी, रामकृष्ण हरी वंजारी यांचे पूर्णत: घर जळून खाक झाले. यात बंडू वंजारी यांच्या घरातील तांदूळ, गहू, तुर, लाखोरी, घरगुती भांडे, सोन्याचे दागिने आदी वस्तुंचे एक लाख रूपये नुकसान झाले तर रामकृष्ण वंजारी यांच्या घरातील तांदूळ, गहू, लाखोरी, तुर, कपडे, भांडी, टीव्ही, दागिने असा एकूण ९३ हजारांचे नुकसान झाले. प्रेमलाल तुमसरे यांच्या घरातील तांदूळ, गहू, दाळ, फ्रिज, कुलर, टीव्ही, भांडी आदीचे एक लाख दहा हजाराचे नुकसान झाले. कचरू वंजारी यांच्या गोठ्यातील पशुखाद्य, कुलर आदी वस्तुंंचे २६ हजार रूपयाचे नुकसान झाले. दुपारी ३.३० वाजता या घरात आग लागली. सालई येथे घरांना आग लागल्याचे माहित होताच तहसिलदार नवनाथ वानखेडे कातकडे यांनी तुमसर नगर परिषद अग्नीशामक दलाचे पथक पाठविण्यास कळविले. तसेच सालई बु. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुसमरे यांनी स्वत:ची पाण्याचे टँकर पाठवून आग विझवली. तोपर्यंत दोन घरे पूर्णत: जळाली होती. एक घर वाचविण्यात यश आले. चार म्हशी, दोन बैल, एक बछडा अशी जनावरे जळाली. यात तीन म्हशी गंभीर जळाल्या. एक बछडा मृत्यू पावला. तरूण जनावरांना वाचविण्यासाठी धडपडत होते. तहसिलदार नवनाथ कातकडे, तलाठी नंदीनी अडकिने, के.जी. तिजारे, चंदन नंदनवार, सुरेंद्र घोडीचोर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. या तिन्ही कुटूंबांची धान्याची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत स्वस्त धान्य दुकानदार धनपाल तुमसरे यांना धान्य पुरविण्याचे निर्देश तहसीलदारांनी दिले आहे. या बाधित कुटुंबांना शासन निर्णयाप्रमाणे नुकसानीची भरपाई देण्यात येणार असल्याचे तहसलिदार नवनाथ कातकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आमदारांनी दिली तहसीलदारांना सूचनासालई बु येथे घरांना आग लागल्याची माहिती सर्वप्रथम आमदार चरण वाघमारे यांनी तहसिलदारांना दिली. तहसिलदारांनी तात्काळ धाव घेऊन प्रशासकीय पातळीवर यंत्रणेला सुचना देऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. डोंगरगाव येथील चंद्रकला कुलरकर यांच्या गाईच्या गोठ्याला सकाळी ८.३० वाजता आग लागली. यात एक शेळी जळाली. यात सात हजाराचे नुकसान झाले.
तीन घरे आगीत खाक
By admin | Updated: May 21, 2017 00:14 IST