शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

गोसेखुर्द धरणाचे तीन दरवाजे अर्धा मीटरने उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:15 IST

मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात आलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या जलसाठ्यात वाढ झालेली आहे.

धरणस्थळी पर्यटकांची गर्दी : -तर रोजगाराला मिळू शकतो वावलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात आलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या जलसाठ्यात वाढ झालेली आहे. परिणामी गोसेखुर्द धरणाचे तीन वक्रद्वारे अर्धा मिटरने उघडण्यात आली असून १० हजार ६६५ क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. भंडारा जिल्ह्यात अपेक्षेनुरुप अजूनपर्यंत पाऊस बरसलेला नाही. काही ठिकाणी आलेल्या पावसामुळे धान पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. भंडारा जिल्ह्यासह विदर्भातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणाची पाण्याची पातळी २४४ मीटरवर पोहोचली आहे. मध्यप्रदेश सीमावर्ती भागात व वैनगंगा नदीच्या पात्रात पाऊस बरसल्याने नदीच्या जलसाठ्यात वाढ झालेली दिसून येत आहे.परिणामी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आली आहे. सध्या वैनगंगा नदीच्या कारधा नदीपात्रात १२ फूट जलसाठा आहे. संजय सरोवराच्या पातळीत वाढ झाल्याने पाणी वैनगंगेत सोडण्यात आले.दुसरीकडे धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे जिल्हाभरातून पर्यटक भेट देत आहेत. परिणामी क्षेत्रातील रोजगारालाही चालना मिळत आहे. पावसाची टक्केवारीजिल्ह्यात १ जून ते १७ जुलैपर्यंत बरसलेल्या पावसाची एकूण टक्केवारी ५७ इतकी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २४८.४ मि.मी. पाऊस बरसल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी १३३० मि.मी. पाऊस बरसतो. मागील ४७ दिवसात तालुकानिहाय नोंदीत भंडारा तालुक्यात २४५.३ मि.मी., मोहाडी १८९.१, तुमसर २३५.८, पवनी १९४.५, साकोली २५८.८, लाखांदूर २४४.६ तर लाखनी तालुक्यात ३७०.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. सातही तालुक्यात बरसलेल्या एकूण पावसाची नोंद १७३८.९ मि.मी. करण्यात आली असून त्याची सरासरी २४८.४ मि.मी. इतकी आहे.