शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' मारहाणीतील तीन आरोपी गजाआड

By admin | Updated: December 18, 2015 00:56 IST

शहरातील नेहरू शाळेच्या पटांगणात जुना वादातून एका युवकावर धारदार शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना दि.३० नोव्हेंबरला घडली होती.

तुमसरातील प्रकार : गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांची कारवाईतुमसर : शहरातील नेहरू शाळेच्या पटांगणात जुना वादातून एका युवकावर धारदार शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना दि.३० नोव्हेंबरला घडली होती. तेव्हापासून घटनास्थळावरून फरार तीन आरोपींना काल १६ डिसेंबरला रात्री ८.३० च्या सुमारात आंबेडकर वॉर्डातून गजाआड करण्यात तुमसर पोलिसांना यश आले आहे.रफिक निशार शेख (२९) रा. आंबेडकर वॉर्ड तुमसर, महेश उर्फ रॉकी प्रकाश वासनिक (२४) रा. आंबेडकर वॉर्ड तुमसर, शुभम उर्फ झब्या देवेंद्र कटकवार (२३) रा. कुंभारेनगर तुमसर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.दि.२९ नोव्हेंबर रोजी गंभीर जखमी प्रफूल उर्फ कान्या प्रभू गभने वय २५ वर्ष रा. कुंभारेनगर तुमसर हा नागपुरहून त्याच्या लहान भावास व लहान ताईस भेटण्यास आल्याची माहिती वॉर्ड व नगरातील काही युवकांना मिळाली होती. ती माहिती अन्य इसमांना दिल्याने हे तिघेही प्रफुलच्या शोधात फिरत होते. या दरम्यान प्रफुल उर्फ कान्या हा नेहरू शाळेलगतच्या पानटपरीवर बसला असताना काही कळायच्या आत त्याला पकडून फरफटत नेहरू शाळेच्या पटांगणावर नेण्यात आले. अंधार असलेल्या ठिकाणी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर अवस्थेत कोणीतरी येत असल्याचे पाहून चार जण घटनास्थळावरून पसार झाले होते. चारपैकी एक आरोपी श्रीकांत उर्फ डोडल हटवार (२६) रा. कुंभारेनगर याला अटक करण्यात आली. परंतू उर्वरित आरोपी तुमसर बाहेर पडून जाण्यात यशस्वी झाले. तेव्हापासून तुमसर पोलीस त्यांच्या मार्गावर होती. परंतु आरोपीचा काही सुगावा लागला नव्हता. दरम्यान दि.१६ डिसेंबरला तिन्ही आरोपी तुमसरात दाखल झाल्याची माहिती खबऱ्यांनी देताच तुमसर पोलिसांनी सापळा रचून आरोपीच्या घरातूनच अटक केली आहे. तुमसर पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंविचे कलम १४५, १४७, १४८, १४९, ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)