शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

वनभरतीसाठी हजारो युवक दाखल

By admin | Updated: November 7, 2016 00:42 IST

नागपूर वनवृत्तांतर्गत विभागातील रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया सुरु झालेली आहे.

पहाटेपासून होणार चाचणी : भंडारा उपवन संरक्षक कार्यालय सज्जभंडारा : नागपूर वनवृत्तांतर्गत विभागातील रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया सुरु झालेली आहे. भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत असलेल्या रिक्त पदांसाठी उद्या (दि.७) पासून भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी सुमारे १२ हजार युवक युवती सहभागी होत आहेत.नागपूर वनविभागाच्या अखत्यारीत भंडारा, वर्धा, गोंदिया व नागपूर हे उपवनसंरक्षक कार्यालय आहेत. या चारही विभागात विविध प्रवर्गातील सुमारे १५६ रिक्त पदे आहेत. ही पदभरती प्रक्रिया वर्धा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. उद्या सोमवारपासून भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया प्रारंभ होत आहे. १५६ रिक्त जागांसाठी राज्यातील कानाकोपऱ्यातील सुमारे ४८ हजार युवक युवतींनी वन विभागाकडे अर्ज केलेले आहेत.यातील भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयात रिक्त असलेल्या जागांचाही समावेश आहे. मुख्य वन संरक्षकांनी चारही उपवन संरक्षक कार्यालयाला १२ हजार उमेदवार विभागून दिलेले आहेत. भंडारा येथील रिक्त पदांची प्रक्रिया गडेगाव लाकूड आगारात सुरु होत आहे. ७ ते १२ नोव्हेंबर पर्यंत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. उद्या पहिल्या दिवशी युवतींची शारीरिक चाचणी तर युवकांची उंची व वजन चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर २१ नोव्हेंबरला पलाडी ते कोका रोड या मार्गावर धावण्याची स्पर्धा घेण्यात येईल. त्यात गुणवत्ता श्रेणीत येणाऱ्या युवक - युवतींची निवड होणार आहे. ही धावण्याची स्पर्धा युवकांसाठी ५ कि.मी. तर युवतींसाठी ३ कि.मी.ची राहणार असून हे अंतर अर्ध्या तासाच्या आत गाठायचे उद्दिष्ट्ये ठेवलेले आहे. अनेक दिवसांपासून सुशिक्षित बेरोजगारांची फौज तयार झालेली आहे. अनेक ठिकाणी चाचपणी करूनही युवकांना रोजगार मिळत नसल्याने वनविभागाच्या भरती प्रक्रियेत उच्चशिक्षित उमेदवारांनी मोठ्या उमेदीने अर्ज सादर केलेले आहेत. या भरती प्रक्रियेतून त्यांना नोकरीची संधी मिळेल अशी आशा उराशी बाळगून अनेक युवक भंडारा शहरात दाखल होत आहेत. ही भरती प्रक्रिया पारदर्शकतेत पार पाडावी यासाठी वनविभागाचे सुमारे ७० वनकर्मचारी या प्रक्रियेदरम्यान डोळ्यात अंजन घालून कारवाई जबाबदारीने पार पाडण्यासाठी सज्ज आहेत. (शहर प्रतिनिधी)भरती प्रक्रियास्थळी मिळणार सुविधाभरती प्रक्रिया राबविताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भंडारा वनविभागाने पोलीस प्रशासनासह वन कर्मचाऱ्यांची मदत घेतलेली आहे. सोबतच वैद्यकीय सुविधाही भरती प्रक्रिया स्थळी ठेवण्यात आलेली आहे. भरती प्रक्रिया पारदर्शकतेने पार पाडावी यासाठी वरिष्ठांच्या निर्देशाचे पालन करण्यात येत आहे. कुणाला भूलथापा देऊन नोकरी लावून देण्याचे आमिष मिळत असल्यास अशा बाबीस बळी न पडता त्याची तक्रार वनविभागाकडे करावी. सोबतच भरती प्रक्रियेत अनियमितता आढळून आल्यास त्याचीही तक्रार विभागाकडे करता येईल. - उमेश वर्माउपवनसंरक्षक, भंडारा.