शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात हजारो क्विंटल उन्हाळी धान मोजणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 13:16 IST

भंडारा जिल्ह्यात उन्हाळी धानाची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. लॉकडाऊनच्या काळात हा धान शेतकऱ्यांच्या घरी आला आहे. मात्र जिल्ह्यात उन्हाळी धानासाठी केवळ एकमेव आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू असल्याने हजारो क्विंटल धान मोजणीच्या प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात एकच केंद्र सुरू अवकाळी पावसाची टांगती तलवार

मुखरू बागडेलोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात उन्हाळी धानाची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. लॉकडाऊनच्या काळात हा धान शेतकऱ्यांच्या घरी आला आहे. मात्र जिल्ह्यात उन्हाळी धानासाठी केवळ एकमेव आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू असल्याने हजारो क्विंटल धान मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचा फायदा खासगी व्यापारी घेत असून ३०० ते ४०० रुपए प्रती क्विंटल घाटा सहन करून धान विकत आहेत.भंडारा जिल्ह्यात खरीपानंतर उन्हाळी धानाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. आता हा उन्हाळी धान काढणीचा हंगाम सुरू आहे. शेकडो क्विंटल धान शेतकऱ्यांच्या घरी येत आहे. कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहे. अशा काळात दोन पैसे मिळविण्यासाठी शेतकरी धान विकण्याच्या तयारीत आहे. मात्र खरेदी केंद्राअभावी धान विकण्यास अडचणी निर्माण होत आहे.उन्हाळी धानाची आधारभूत खेरेदी १ मे पासून करण्याचे आदेश आहे. साकोली तालुक्यातील सानगडी येथील एकमेव आधार केंद्र सुरू आहे. लॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. दुसरीकडे धान खरेदीही प्रभावित झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने अनेक शेतकरी व्यापाऱ्यांना आपला धान विकत आहे. व्यापारी या शेतकऱ्यांकडून प्रती क्विंटल हमीभावापेक्षा ३०० ते ४०० रुपए कमीने धान खरेदी करीत आहे. यात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.लाखनी तालुक्यात १९८२ हेक्टवर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली होती. त्यात चुलबंध खोऱ्यात ९८१ हेक्टर धानाचा समावेश आहे. आता १५ मे उजाडला तरी धान खरेदी सुरू झाली नाही. खरीप हंगामातील धानाची उचल न झाल्याने आजही तो शासकीय गोदामात पडून आहे. आणि हिच खरी अडचण उन्हाळी धान खरेदीसाठी आहे.भरडाई झालेल्या तांदळाची उचलच नाहीखरीप हंगामात जिल्ह्यात ३२ लाख १० हजार क्विंटल धानाची खरेदी आधारभूत केंद्राच्या माध्यमातून करण्यात आली. आतापर्यंत १९ लाख क्विंटल धानाची भरडाई आटोपली असून १३ लाख क्विंटल धानाची भरडाई व्हायची आहे. गोदाम व्यवस्था तोकडी असल्याने उन्हाळी धान खरेदीसाठी खरी अडचण येत आहे. पालांदूर येथील सोसायटीचे अध्यक्ष विजय कापसे म्हणाले, पालांदूर केंद्राकडे ४० हजार क्विंटल धान शिल्लक आहे. गोदाम भरलेले आहेत. खुल्या पटांगणात १० हजार क्विंटल धान पडून आहे. त्यामुळे उन्हाळी धान खरेदीस विलंब होत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.गोदाम व्यवस्था अपुरी असल्याने उन्हाळी धान हंगामाला विलंब होत आहे. मात्र येत्या एक दोन दिवसात धान खरेदी निश्चित सुरू करण्यात येईल.

टॅग्स :agricultureशेती