शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

उष्माघाताने हजारो कोंबड्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:38 IST

तालुक्यातील वैनगंगा नदी काठावरील टेकेपार (कोरंभी) हद्दीत असलेल्या एका पोल्ट्री फार्ममधील बाराशेच्या वर कोंबड्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. प्रत्येकी दोन किलो वजनाच्या या कोंबड्यांच्या मृत्यूमुळे पोल्ट्रीफार्म मालकाचे सुमारे दोन ते अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील वैनगंगा नदी काठावरील टेकेपार (कोरंभी) हद्दीत असलेल्या एका पोल्ट्री फार्ममधील बाराशेच्या वर कोंबड्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. प्रत्येकी दोन किलो वजनाच्या या कोंबड्यांच्या मृत्यूमुळे पोल्ट्रीफार्म मालकाचे सुमारे दोन ते अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.किशोर डोंगरे यांच्या मालकीचे हे पोल्ट्रीफार्म असून रविवारला दुपारपासून कोंबड्यांच्या मृत्यूची सुरूवात झाल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारला सकाळी १० वाजेपर्यंत १,२०० कोंबड्या मृत्युमुखी पडल्यामुळे डोंगरे हे कमालिचे धास्तावले. या कोंबड्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत काही कळले नसल्याचे त्यांनी सांगितले.कोंबड्यांचा मृत्यू नेमका विषबाधेने झाला की उष्माघाताने याची तपासणी करण्यासाठी त्यांनी मानेगावचे पशुधन विकास अधिकारी डॉ.गुणवंत भडके यांना बोलाविले. त्यांनी काही कोंबड्याचे शवविच्छेदन करून पोल्ट्रीफार्मची पाहणी केली असता या कोंबड्याचा मृत्यू हा कडक उन्हामुळे झाल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी डोंगरे यांनी कारधा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.पोल्ट्रीफार्म मालकांनी अशी घ्यावी काळजीविदर्भामध्ये उन्ह चांगलीच तापत आहे. तापमान ३५ अंश सेल्सीअस पुढे गेल्यास मोठ्या पक्षांना श्वसनक्रियेत त्रास होतो व पक्षी मृत्यूचे प्रमाण वाढते. कारण पक्ष्यांना घामाच्या ग्रंथी नसल्याने श्वसनाने उष्माचे उत्सर्जन करतात. त्यांना शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे कठीण जाते. त्यामुळे पक्षी दगावतात. त्याकरिता पोल्ट्री फार्मच्या शेडमधील तापमान नियंत्रित करणे गरजेचे आहे. शेडमध्ये पंखे, फॉगर बसविणे, दुपारच्यावेळेस कोंढ्यामध्ये ओलावा निर्माण करणे, छतवरील पत्र्यांना आतुन व बाहेरून चुना लावणे, छतावर गवत किंवा तणीस टाकणे किंवा छतावर तुषार सिंचनाची व्यवस्था करणे, पाण्याची टाकी व पाण्याचे पाईप गरम होणार नाहीत याची व्यवस्था करावी, गरम हवा आत शिरणार नाही याची काळजी घेऊन दुपारी १२ ते ४ वाजेच्या दरम्यान खाद्य देऊ नये, असे पशुधन विकास अधिकारी डॉ.गुणवंत भडके यांनी सांगितले.