शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी लिकेजमुळे हजारो लिटर पाणी व्यर्थ

By admin | Updated: February 13, 2017 00:22 IST

मागील एक ते दीड महिन्यापासून तुमसर शहरात दूषित पाणीपुरवठा सुरु आहे. शनिवारी येथे नळाच्या पाण्यातून नारु आला.

नळातून निघाला नारु : दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा,तुमसरकरांचे आरोग्य धोक्यात, जलवाहिन्यांचे आयुष्य संपलेतुमसर : मागील एक ते दीड महिन्यापासून तुमसर शहरात दूषित पाणीपुरवठा सुरु आहे. शनिवारी येथे नळाच्या पाण्यातून नारु आला. तुमसर ते देव्हाडी दरम्यान शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी लिकेज असल्याने दररोज हजारो लिटर पाणी व्यर्थ जात आहे. शेतात सध्या पाणी जमा झालेले दिसत आहे. एकीकडे शहराला एकवेळ पाणी पुरवठा केला जातो तर दुसरीकडे हजारो लिटर पाणी वाया जात आहे.तुमसर शहराला वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. माडगी (दे.) येथे नदी पात्रात दोन मोठ्या विहिरी असून नदी काठावर पंपगृह आहे. पंपगृह ते तुमसर शहर असे नऊ ते दहा कि.मी. अंतर आहे. तुमसर गोंदिया राज्य महामार्ग तथा देव्हाडी तुमसर या रस्त्याशेजारून जलवाहिनी घातली आहे. जलवाहिनी ठिकठिकाणी लिकेज आहे. या लिकेजमधून दररोज हजारो लिटर पाणी व्यर्थ जात आहे. परंतु पालिका प्रशासनाचे येथे सातत्याने दुर्लक्ष सुरु आहे.ही जलवाहिनी खूप जुनी आहे. या जलवाहिनीचे आयुष्य संपल्याची माहिती आहे. परंतु निधी व नियोजनाच्या अभावामुळे ही जलवाहिनीची सेवा निरंतर सुरु आहे. शनिवारल्त्त सुभाष वॉर्डातील अनिल गिऱ्हेपुंजे यांचे घरी नळाच्या पाण्यातून नारु निघाला. दुर्गंधीयुक्त पाणी मागील एक ते सव्वा महिन्यापासून येत असल्याची माहिती त्यांनी दिली. तुमसर शहरात केवळ सकाळी एकच वेळ अर्धा ते पाऊण तास पाणी पुरवठा केला जातो. ३५ ते ४० लिटर केवळ पाणीपुरवठा करणे सुरु आहे. शहरात जलशुद्धीकरण केंद्र आहे. पाणी शुद्धीकरण केल्यानंतर वितरीत केल्या जाते. असा पालिका प्रशासनाचा दावा आहे. मग पाण्यातून नारु व दुर्गंधीयुक्त पाणी कुठून येते हा संशोधनाचा विषय आहे. तुमसर शहर अर्धे तहानलेले आहे. अर्ध्या शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन येथे करण्याची गरज आहे. बारमाही वाहणारी वैनगंगा नदी केवळ पाच व नऊ कि.मी. अंतरावरून वाहते. परंतु कायमस्वरुपी व पूर्ण शहराला अजूनही पाणी या मूलभूत घटकांची प्रतिक्षा आहे. अनेक योजना यशस्वी राबविण्याचा दावा आतापर्यंत प्रत्येकांनीच केला. परंतु पाणीपुरवठा ही योजना यशस्वी राबविण्यात कुणालाच यश आले नाही. तुमसर पालिकेत भाजपाला एकहाती सत्ता प्राप्त झाली. नगरपालिकेतून राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आहे. किमान तुमसरकरांना दोन वेळचे पाणी मुबलक देण्याकरिता येथे प्रयत्न करण्याचे आवाहन नवीन पदाधिकाऱ्यांसमोर निश्चितच आहे. (तालुका प्रतिनिधी)जलवाहिनी लिकेजमुळे समस्या निर्माण होत आहे. शहराला जलशुद्धीकरण केलेले पाणी वितरीत करण्यात येते. लिकेज दुरुस्ती लवकरच करण्यात येईल.- प्रशांत गणवीर,कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग, न.प. तुमसर.