शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ उपविभागांना हवी जिल्ह्यात एन्ट्री!

By admin | Updated: December 21, 2014 22:52 IST

शेतीच्या सिंचनासाठी महत्वपूर्ण विभाग म्हणून समजल्या जाणाऱ्या लघु पाटबंधारे विभागाच्या तीन नविन उपविभागांना कार्यान्वित करण्यासाठी एन्ट्री हवी आहे. तांत्रिक अडचण व शासन दिरंगाई यामुळे मंजुरी

मंजुरी आली, पण कारवाई अडली : तर पाण्याची समस्या सुटू शकतेअशोक पारधी - भंडाराशेतीच्या सिंचनासाठी महत्वपूर्ण विभाग म्हणून समजल्या जाणाऱ्या लघु पाटबंधारे विभागाच्या तीन नविन उपविभागांना कार्यान्वित करण्यासाठी एन्ट्री हवी आहे. तांत्रिक अडचण व शासन दिरंगाई यामुळे मंजुरी असूनही जिल्हयातील तुमसर, मोहाडी व लाखांदूर येथे नवीन लघु पाटबंधारे उपविभाग कार्यान्वित झालेले नाहीत. भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून राज्यात प्रसिध्द आहे. त्यामुळे तलावात पाणी साठा असो किंवा नसो सिंचनाचा अनुशेष नाही म्हणून शासनाकडून दुर्लक्षित केले जात आहे. १४२१ मालगुजारी तलावभंडारा जिल्ह्यात माजी मालगुजारी तलाव १४२१, लघु पाटबंधारे तलाव १४४, कोल्हापुरी बंधारे १७९, साठवण बंधारे २६२, सिमेंट प्लग बंधारे ३१५, पाझर तलाव १५ अशा एकूण २०६९ योजना आहेत. त्याची सिंचन क्षमता ४४६०० हेक्टर आहे परंतु त्याचे देखभाल दुरुस्तीवर लक्ष ठवेणारा अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग मात्र पुरेशा प्रमाणात नाही. तसेच मंजूर असलेले तीन उपविभाग कार्यान्वित न झाल्याने शेतकऱ्यांना पाणी पाहिजे असल्यास ७० ते ८० किमी अंतरावर पायपीट करावी लागत आहे. १०९ पदांना मुदतवाढ शासनाचे लघु सिंचन (जलसंधारण) विभागाने जिल्हा परिषदेकरीता ६ मे च्या शासन निर्णयान्वये एक कार्यकारी अभियंता, ७ उपविभागीय अभियंता, ३४ शाखा अभियंता व इतर कार्यालयीन कर्मचारी असे एकूण १०९ पदांना ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. पदांना मंजूरी असतांना तत्कालीन राज्य शासनाने मंजूर असलेले तीन उपविभाग कार्यान्वित केले नाही. शेतकऱ्यांची पायपीट जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभाग भंडाराचे पवनी, साकोली व भंडारा येथे तीन उपविभाग सद्यस्थितीत कार्यरत आहेत. शासन निर्णयानुसार नव्याने तुमसर, मोहाडी व लाखांदूर येथे उपविभाग सुरु करावा. यासाठी २५ जून २०१० पासून आजतागायत जिल्हा परिषदेने प्रयत्न केलेला आहे. पंरतु शासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे तुमसर, मोहाडी व लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना भंडारा, साकोली व पवनी येथील उपविभागात जावे लागते. जे काम तालुक्याचे ठिकाणी होऊ शकते त्या कामासाठी काही एक कारण नसताना उपविभाग कार्यान्वित न झाल्यामुळे अन्य तालुक्यात जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.