शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ राष्ट्रीयीकृत बँकेतील खातेधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 01:03 IST

जिल्ह्यात ग्राहकांच्या सेवेसाठी राष्ट्रीयीकृत बँकेच्या अनेक शाखा असल्या तरी पंजाब नॅशनल बँकेची शहरात एकमेव शाखा आहे. त्यामुळे बँकेच्या खातेधारकांना दररोज गत अनेक दिवसापासून त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । खातेधारकांसह लोकप्रतिनिधींंनाही दिली जातात उडवाउडवीचे उत्तरे, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेने वाढला कामाचा ताण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात ग्राहकांच्या सेवेसाठी राष्ट्रीयीकृत बँकेच्या अनेक शाखा असल्या तरी पंजाब नॅशनल बँकेची शहरात एकमेव शाखा आहे. त्यामुळे बँकेच्या खातेधारकांना दररोज गत अनेक दिवसापासून त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पंजाब नॅशनल बँकेत कर्मचाऱ्यांची वानवा असून शहरात इतरत्र कुठेही शाखा नाही. त्यामुळे खातेधारकांची दररोज गर्दी कायम राहते.व्यापारी, आबालवृद्ध, विद्यार्थी त्यांच्यासह अनेक जणांची बँकेत व्यवहार असल्याने लग्नसराईच्या दिवसात खातेधारकांना दररोज तासन्तास रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. सकाळी १०.३० वाजतापासून बँकेत लांबच लांब रांगा लागतात. बँकेत कर्मचारी, एक शाखा प्रमुख, एक इन्चार्ज आॅफीसर, दोन कारकून आणि एक आर्थिक देवाण घेवाणीचा काउंटर एवढ्यावरच बँकेचा कारभार चालू आहे. त्यामुळे दिवसभरात मर्यादित कामे होत असल्याने खातेधारकांना पुन्हा दुसºया दिवशी आपल्या कामासाठी हेलपाट्या माराव्या लागतात.उन्हाळ्याच्या दिवसात बँकेत आलेल्या ग्राहकांना पिण्याच्या पाण्याची सोय देखील केलेली नाही. सोमवारी खातेधारकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव अरुण गोंडाणे यांनी बँक महिला कर्मचाºयाला ग्राहकांच्या होणाºया त्रासाबद्दल विचारणा केली. तेव्हा त्या कर्मचाºयाने उलटसुलट उत्तरे देत आम्ही काय करणार? आम्ही काही करू शकत नाही? अशा प्रकारे उलट सुलट उत्तरे दिली.नाव विचारताच नावाला काय करायचे आहे असे सांगत लोकप्रतिनिधींना देखील हे बँक कर्मचारी जुमानत नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अशा गैरवर्तणूक करणाºया बँक कर्मचाºयांवर तात्काळ कारवाई करून खातेधारकांना न्याय देण्याची गरज आहे.कर्मचाऱ्यांची वानवाकर्मचाºयांची लंच टायमिंग, पाणी पिणे, चहासाठी बाहेर जाणे यासारख्या कारणांमुळे देखील ग्राहकांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. याबाबत शाखा प्रमुखांना देखील अनेक खातेधारकांनी याबाबत सांगितले आहे. परंतु त्याबाबत अद्यापही तोडगा निघालेला नाही. बँकेत कर्मचाºयांची वानवा असल्याने कामाचा ताण वाढला आहे.जिल्ह्यात बँक कर्मचाऱ्यांच्या तक्रारीत वाढशहरासह ग्रामीण भागात आर्थिक देवाण घेवाणीसाठी राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा वाढल्या असल्या तरी वाढत्या खातेधारकांच्या संख्येमुळे व लिंक फेलच्या ग्रहणामुळे बँक कर्मचारी सातत्याने ग्राहकांवर संतापत असल्याचे प्रकार वाढले आहेत. आबाल वृद्धासह विद्यार्थ्यांचे हाल होत असताना बँक कर्मचाºयांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. याबाबत जनसामान्यांत रोष दिसून येत आहे.

टॅग्स :bankबँक