शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

‘त्या’ २५ घरातील कुटुंब मृत्यूच्या दाढेत

By admin | Updated: April 7, 2016 00:25 IST

वैनगंगा नदीपात्र सन २०१२ पासून गावाच्या दिशेने झपाट्याने वाढत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : रेड झोनमध्ये वास्तव्यमोहन भोयर तुमसर वैनगंगा नदीपात्र सन २०१२ पासून गावाच्या दिशेने झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत ३३.११ हेक्टर शेतजमीन नदीपात्रात गिळंकृत झाली. ४८.८० हेक्टर शेतीला याचा प्रत्यक्ष फटका बसला. रेंगेपार येथे भीषण स्थिती दृष्य बघितल्यावर येते. अक्षरश: मृत्यूच्या दाढेत येथे २० ते २५ घरे आहेत. रस्ता व नदीचे अंतर केवळ दोन फुट इतके शिल्लक आहे. परंतु शासन व प्रशासनाने कोणतीच कारवाई केलेली दिसत नाही.वैनगंगा जीवनदायीनी मागील शेकडो वर्षापासून निरंतर वाहत आहे. प्रचंड वाळू उपस्यामुळे नदीने पात्र बदलविले असून ती गावाच्या दिशेने झपाट्याने येत आहे. सन २०१२ पासून वैनगंगा नदीने रेंगेपार, बोरी, कोष्टी, उमरवाडा येथील ३३.११ हेक्टर शेतजमिन नदीपात्रात समाविष्ट झाली आहे. तर ४८.८० हेक्टर शेतजमिनीला याचा प्रत्यक्ष फटका बसला आहे. या गावातील नदीकाठावरील विहिरी व जलकुंभ नदीपात्रात गेले. लाखोंचे नुकसान येथे झाले आहे. रेंगेपार येथे वैनगंगा नदी झपाट्याने गावाला कवेत घेण्याकरिता सरसावीत आहे. येथील २० ते २५ घरांचे अंतर नदीकाठापासून केवळ दोन फुटावर आहे. नदीकाठ येथे खूप उंच असून खाली दरी दिसते. मागील वर्षी पाऊस अत्यल्प पडल्याने नदीने रौद्र रुप धारण केले नव्हते. काहींचे मागील दार एक फुटावर येवून ठेपले आहे. गाळाची सुपिक जमीन गरीब शेतकऱ्यांची नदी पात्रात गेगली. रेंगेपार येथे जिल्हा परिषदेची शाळा रस्त्याच्या पलिकडे आहे. शाळेचे अंतर अगदी कमी आहे. रेंगेपार सिलेगाव रस्त्यावरून बसगाड्या व इतर वाहने दिवसभर धावतात. चालकाचे नियंत्रण सुटले तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.भूखंड दिलेराज्य शासनाने रेंगेपार येथे आंदोलनानंतर भूखंड दिले. परंतु स्थानिक नागरीक गरीब असल्याने त्यांनी अजूनपर्यंत घरे बांधली नाही. त्यामुळे ते अजूनही धोकादायक रेड झोन मधील घरातच वास्तव्य करीत आहेत.रेंगेपारची स्थिती अतिशय भयानक आहे. किमान अर्धा गाव रेड झोनमध्ये आहे. शासनाने केवळ भूखंड दिले. परंतु गरीबांना येथे घरे बांधून देण्याची गरज आहे. गावाचे काय होईल याची चिंता ग्रामस्थांना आहे.- हिरालाल नागपुरेगटनेता, पं.स. तुमसर