शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ लाभार्थ्यांना मिळणार दोन कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 01:18 IST

तुमसर पंचायत समिती अंतर्गत शौचालय बांधकामांचे लाभार्थ्यांना सुमारे चार कोटींचा निधी मागील सहा महिन्यांपासून थकीत आहे.

आश्वासन : प्रकरण शौचालय बांधकामाचेलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर पंचायत समिती अंतर्गत शौचालय बांधकामांचे लाभार्थ्यांना सुमारे चार कोटींचा निधी मागील सहा महिन्यांपासून थकीत आहे. लाभार्थ्यांना याचा फटका बसत आहे. तुमसर पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपूरे यांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना याप्रकरणी भेटून चर्चा केली. येत्या आठ दिवसात तुमसर पंचायत समितीला दोन कोटींचा निधी मिळणार असल्याचे आश्वासन मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी दिले.तुमसर तालुक्यात शौचालय बांधकामांचा प्रचार व प्रसार पंचायत समितीच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी केला होता. तालुक्यातील नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ही मोहिम येथे राबविण्यात आली. लाभार्थ्यांनी स्वत:जवळील रूपये खर्च केले तर काहींनी कर्ज घेऊन शौचालय बांधले. शौचालय बांधकाम झाल्यावर उर्वरित रक्कम मिळाली नाही. स्थानिक पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना लाभार्थ्यांनी जाब विचारला स्वत: लाभार्थी पंचायत समिती कार्यालयात येऊन निधीची मागणी केली. परंतु त्यांना शासनाकडून निधी प्राप्त झाली नाही, असे उत्तर देण्यात येत होते.दोन दिसापुर्वी तुमसर पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपुरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सुर्यवंशी यांची भेट घेऊन शौचालय बांधकाम निधीबाबत चर्चा केली. सुर्यवंशी यांनी भंडारा जिल्ह्याकरिता सहा कोटींचा निधी प्राप्त झाला असून त्यातील दोन कोटी रूपये आठ दिवसात तुमसर तालुक्याला देण्याचे आश्वासन दिले. लाभार्थ्यांना येथे लवकरच निधी प्राप्त होणार आहे. मागील सहा महिन्यापासून निधीची येथे लाभार्थ्यांना प्रतिक्षा होती. निधीला विलंब कां लागला याचे उत्तर कुणीच देत नाही. कर्ज घेऊन शौचालयांचे बांधकाम करण्यात आले हे विशेष. शासकीय योजना व उपक्रमात सहभाग नोंदविणाऱ्या लाभार्थ्यांना किमान निधी करीता फरफट न व्हावी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.तुमसर तालुक्यातील शौचालय बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांना सुमारे दोन कोटींचा निधी आठ दिवसात प्राप्त होणार असल्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले. लाभार्थ्यांना बरेच दिवस येथे प्रतिक्षा करावी लागली. यापुढे तात्काळ निधी प्राप्त होण्याची गरज आहे.-हिरालाल नागपुरे, गटनेते पंचायत समिती तुमसर.