शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

‘त्या’ २८ गावांना पुराचा धोका आजही कायम

By admin | Updated: July 5, 2016 01:08 IST

दरवर्षी लाखांदूर तालुक्यातील २८ गावांना पुराचा तडाखा सहन करावा लागतो. यंदा हवामान खात्याने चांगल्या

लाखांदूर : दरवर्षी लाखांदूर तालुक्यातील २८ गावांना पुराचा तडाखा सहन करावा लागतो. यंदा हवामान खात्याने चांगल्या पावसाचे शुभवर्तन केल्याने चुलबंद व वैनगंगा नदी काठावरील ‘त्या’ २८ गावांना पुन्हा एकदा पुराचा धोका सहन करावा लागणार आहे. मात्र तालुका प्रशासनाच्या योग्य नियोजनाने सतर्कता सुध्दा बाळगली जाते. तालुक्यातील चुलबंद नदी काठावरील १७ तर वैनगंगा नदीकाठावरील ११ गावे पुर परिस्थितीचा दरवर्षी सामोरे जातात. वाहतुकीच्या दृष्टीने लाखांदुर तालुक्यातील अंतर्गत खेडेगावाना जोडणारी मार्ग सुध्दा नाले भरभरुन वाहत असल्याने बंद पडुन तालुक्याशी संपर्क तुटतो. भंडारा शहराजवळील पाणी पातळीबाबद इशारा पातळी ९.०० मिटर तर धोक्याची पातळी ९.५० मिटर एवढी आहे. लाखांदुर तालुक्याचा २० वर्षाचा पुर परिस्थितीचा आढावा बघीतला असता १९९४ ला आलेल्या महापुराने जनजिवन विस्कळीत करुन टाकले होते. पुरात अडकलेल्यांना हेलीकॉप्टरने सुरक्षित स्थळी बाहेर काढावे लागले होते. त्यानंतर १४ ते १७ सप्टेंबर २००५. दि. १३ ते १७ आॅगस्ट २००६ दरम्यान मोठी पुरपरिस्थीती ओढवली होती. विविध नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन संदर्भात प्रतिबंध, निवारण, पूर्वतयारी, प्रतिसाद, मदत व पुनर्वसन इत्यादी बाबी सुव्यवस्थित हाताळण्यासाठी केंद्र शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंमलात आणला. या कायद्यातील तरतुदीला अनुसरुन महाराष्ट्रात मुख्यमंत्र्याचे अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाची स्थापना करण्यात आली होती.पुरामुळे त्या नदीकाठावरील २८ गावांना फटका बसत असला तरी त्याहीपेक्षा चौरास भागात शेकडो हेक्टर धानपिक दरवर्षी पाण्याखाली सापडते. वैनगंगा नदीकाठावरील आवळी, तर चुलबंद नदीकाठावरील खोलमारा/ बु. या गावाचा दरवर्षी तालुक्याशी संपर्क तुटतो. या दोन्ही पुरग्रस्त गावांचे शासनाने यापुर्वी पुनर्वसन केली होते. परंतु पुनर्वसन करताना शासनाने पुर्णपणे मदतकार्य व अटी, शर्तीची पुर्तता न केल्याने आमचे पुनर्वसन झालेच नसल्याचे समजुन दोन्ही पुरग्रस्त गावानी ते गाव सोडले नाही. असे पुरग्रस्तांचे म्हणने आहे. गोसेखुर्द धरणाच्या कालव्याचे जाळे संपुर्ण चौरास भागात पसरले आहेत. अनेक ठिकाणी कालवे खंडित असल्याने पवनी तालुक्यातील पाण्याचा येणारा लोंढा चौरास भागात पसरतो. पाणी निघण्याचा पुढे मार्ग नसल्याने हजारो हेक्टर शेतजमीन जलमय होते. ही परिस्थिती जास्त दिवसाची रहिल्यास धानपिक सडुन शेतकरी संकटात सापडतो. हा प्रसंग अनेकदा घडला. यासाठी शेतकरी, लोकप्रतिनिधी यांनी अनेकदा आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधून आर्थिक मदतीची मागणी केली पंरतु काही एक अर्थ झाली नाही. तालुक्यातील किरमटी, गवराळा, रोहणी, विरली/खु. मोहरणा, ओपारा, ईटान, नांदेड, खैरी, टेंभरी, विहीरगाव, आवळी, नांदेड हे वैनगंगा काठावरील तर चुलबंद नदीकाठावरील सोनी, धर्मापुरी, पाऊलदवना बोथली, परसोडी मांढळ किन्ही आसोला, आथली, भागडी, खैरी/पट, चप्राड किन्हाळा, लाखांदूर, चिचोली, खोलमारा, बारवा ही गावे पुरामुळे प्रभावीत होतात. प्रकल्पामध्ये संजय सरोवर मध्यप्रदेश तर धरणामध्ये शिरपुर पुजारिटोला, कालीसराड, इटीयाडोह धरणामुळे लाखांदुर तालुक्यात पुरपरिस्थिती ओढवते. (तालुका प्रतिनिधी)पुराचा धोका तालुक्यातील वैनगंगा व चुलबंद नदी काठावरील गावांना बसतो. आपत्ती निवारण कक्षाची स्थापना केली. त्या त्या गावातील कोतवाल तलाठी, सरपंचांना तालुक्याशी संपर्क ठेवुन वेळोवेळी माहिती पुरण्यासंदर्भात सुचना देण्यात आल्या. तालुक्यात नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास प्रशासन त्यावर मात करण्यासाठी सज्ज आहे. पुरपरिस्थितीत नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे. -विजय पवार, तहसिलदार , लाखांदूर