शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

यंदा खरिपात धानासोबत ऊस व तूर पिकांचाही पेरा वाढणार

By युवराज गोमास | Updated: May 4, 2024 15:20 IST

सर्वाधिक १.८१ लाख हेक्टरवर धान : गत वर्षाच्या तुलनेत ११ हेक्टरची वाढ

भंडारा : खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. लवकरच ग्रामीण भागात शेतावर सेंद्रिय खत टाकण्याच्या कामाला वेग येणार आहे. त्याचबरोबर धुरे स्वच्छ करणे, तणकट काढणे, पऱ्ह्यांची जागा तयार करणे आदी कामांची सुरुवात होणार आहे. खरिपाच्या दृष्टीने कृषी विभागही सज्ज झाला आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा धानासोबत ऊस व तूर पिकांचाही पेरा ११ हेक्टरने वाढणार आहे. बियाणे व खतांची उपलब्धता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

जिल्हा कृषी विभागाने यंदा खरिपाच्या लागवडीचे वाढविण्याचा चंग बांधला आहे. दरवर्षी जुलै महिन्यापासून खरीप पिकांच्या लागवडीला सुरुवात होत असत. यंदाही तसा प्रारंभ केला जाणार आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात १ लाख ९६ हजार हेक्टरवर पिकांची लागवड करण्याचे कृषी विभागाचे उद्दिष्ट आहे. यंदाही दरवर्षीप्रमाणे सर्वाधिक १ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्रात धान पीक घेतले जाणार आहे.

बियाणे, खत उपलब्धतेवर अधिक भरभंडारा जिल्ह्यात मुख्यत्वे धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळेच जिल्ह्याला धानाचे कोठार म्हटले जाते. खरिपाचे नियोजन कृषी विभागाने केले असून खते, बियाणे, कीटकनाशके पर्याप्त उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी तयारी चालविली आहे. विविध कामांचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यावर्षी धानासोबतच तूर आणि उसाचा पेरा वाढविण्यावर अधिक लक्ष पुरविले जाणार आहे.

पडीक क्षेत्र येणार लागवडीखालीवाढीव लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिकुटुंब जमिनीचे क्षेत्र कमी पडत आहे. त्यामुळे यंदा लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी पडीक जमील लागवडीखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरित केले जाणार आहे. पडीक क्षेत्रावर पीक घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. असाच प्रयत्न दरवर्षी केला जाणार असल्याने पीक लागवडीखालील क्षेत्र वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. मागील वर्षी १ लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड झाली होती. यावर्षी १ लाख ९६ हजार हेक्टरवर पिकांची लागवड होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

यंदाचे पीकनिहाय लक्षांक (हेक्टर)पीक                                        क्षेत्रधान                                        १,८१,२५४तूर                                          ११,४००ऊस                                        २,३००सोयाबीन                                 १,१४०

४०० हेक्टरने वाढणार तुरीचे क्षेत्रयंदा खरिपात ११,४०० हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाची लागवड होणार आहे. यंदा तुरीचा पेरा ४०० हेक्टरने वाढणार आहे. त्यापाठोपाठ ऊस आणि सोयाबीनची लागवडही वाढविली जाणार आहे. २ हजार ३०० हेक्टरवर उसाची, तर १ हजार १४० हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली जाणार आहे.

यंदा लागवडीचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना वेळेत व गरजेनुसार खते, बियाणे वेळेवर उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. खते, बियाणे खरेदी करताना दुकानदारांकडून फसवणूक होत असेल तर तातडीने कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. अधिकृत कृषी केंद्रामधून खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करावीत. पक्के बिल विक्रेत्यांकडून घेऊन जपून ठेवावे.- संगीता माने, जिल्हा अधीक्षक, कृषी विभाग, भंडारा.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी