शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाचा सिमेंट रस्ता तहानलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 22:02 IST

मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाकरिता सिमेंट रस्त्याचे बांधकाम सध्या जोमात सुरू आहे. सिमेंटीकरण बांधकामाला मुबलक पाण्याची नितांत गरज असते. भर उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट असतो. देव्हाडी-खापा शिवारातील सिमेंट रस्ता तहानलेला असून अत्यल्प पाण्याचा वापर येथे सुरू आहे. कोट्यवधींच्या रस्ता बांधकामावर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. येथे केवळ थातूरमातूर पाणी टाकण्याचा केवळ सोपस्कार पार पाडला जात असल्याची धक्कादायक माहिती आहे.

ठळक मुद्देभर उन्हाळ्यात बांधकाम : पाण्याचे दुर्भिक्ष्य, गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाकरिता सिमेंट रस्त्याचे बांधकाम सध्या जोमात सुरू आहे. सिमेंटीकरण बांधकामाला मुबलक पाण्याची नितांत गरज असते. भर उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट असतो. देव्हाडी-खापा शिवारातील सिमेंट रस्ता तहानलेला असून अत्यल्प पाण्याचा वापर येथे सुरू आहे. कोट्यवधींच्या रस्ता बांधकामावर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. येथे केवळ थातूरमातूर पाणी टाकण्याचा केवळ सोपस्कार पार पाडला जात असल्याची धक्कादायक माहिती आहे.मनसर - गोंदिया - बालाघाट दरम्यान पूर्वी राज्य मार्ग होते. सदर राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषीत करण्यात आले. दुपदरीकरणाची कामे सध्या सुरु आहेत. कोट्यवधींची ही कामे असून देव्हाडी-खापा शिवारात सीमेंट रस्ता बांधकाम सुरु आहे. सीमेंट, गिट्टी व इतर केमीकलचे मिश्रण घालून टणक सीमेंट रस्ता बांधकाम करण्यात येत आहे. सीमेंट रस्ता व पाणी यांचे वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाण निश्चित केले आहे. परंतु येथे केवळ थातूरमातूर पाण्याचा उपयोग केला जात आहे.रस्ता पांढरा, भुसभूशीत सध्या दिसत आहे. भर उन्हाळा सध्या सुरु झाला असून ४२ अंशापर्यंत उन्हाचा पारा वाढला आहे. रस्त्यावर पाणी शिंपडल्यावर केवळ पाच मिनिटात पाण्याचे बाष्पीभवनाची प्रक्रिया सुरु होते. पाण्याचा योग्य प्रमाणात वापर न केल्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची निश्चित शक्यता आहे.पाण्याअभावी येथे रस्ता तहानलेला दिसून येत आहे. सदर रस्त्यावर केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाचे नियंत्रण आहे. भंडारा येथे संबंधित विभागाचे कार्यालय असून नागपूर येथे मुख्य कार्यालय असल्याची माहिती आहे.सीमेंट रस्ता बांधकामाचे निश्चित नियम असून अत्यंत काटेकोरपणे सदर रस्ता बांधकामाचे निर्देश संबंधित विभागाने दिले आहेत. नागरिकांना सध्या पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. विहिरी व तलावांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. सदर सीमेंट रस्त्यावरील लाखो लिटर पाणी कुठून उपलब्ध होत असेल हा संशोधनाचा विषय आहे.सध्या सर्व सरकारी मिशनरी निवडणूक कामात व्यस्त आहे. रस्ता बांधकामाकडे कुणाचे लक्ष असेल हा मुख्य प्रश्न येथे उपस्थित होतो. किमान कोट्यवधींची कामे सुरु असताना नियमांची पायमल्ली तर होत नाही, याकडे अत्यंत काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज आहे.