शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

तिसरा रेल्वे ट्रॅक २०२२पर्यंत पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:51 IST

हावडा-मुंंबई मार्गावर तिसरी रेल्वे ट्रॅकची कामे जोरात सुरू आहे. हावडा ते राजनांदगावपर्यंतच्या रेल्वे ट्रॅक पूर्णत्वास आला आहे. राजनांदगाव ते कळमना दरम्यान पूलांचे व रेल्वे ट्रॅकचा टप्प्याची कामे प्रगतीपथावर असून सदर रेल्वे मार्ग २०२२ पर्यंत पूर्णत्वास येणार आहे.

ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : हालचालींना वेग, हावडा-राजनांदगावपर्यंत बांधकाम पूर्ण

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : हावडा-मुंंबई मार्गावर तिसरी रेल्वे ट्रॅकची कामे जोरात सुरू आहे. हावडा ते राजनांदगावपर्यंतच्या रेल्वे ट्रॅक पूर्णत्वास आला आहे. राजनांदगाव ते कळमना दरम्यान पूलांचे व रेल्वे ट्रॅकचा टप्प्याची कामे प्रगतीपथावर असून सदर रेल्वे मार्ग २०२२ पर्यंत पूर्णत्वास येणार आहे. देशातील ब्रिटीशकालीन मुंबई-हावडा असा हा रेल्वेमार्ग असून पूर्वी तो एकेरी होता. त्यानंतर दुहेरी व सध्या तिहेरी रेल्वे मार्गाचे बांधकाम केले जात आहे.मुंबई-हावडा हा देशातील प्रमुख व प्रथम रेल्वे मार्ग आहे. देशांतर्गत मालवाहतुकीकरीता ब्रिटीशांनी सर्वप्रथम हा रेल्वे मार्ग तयार केला. रेल्वे मार्गाला भारतात लाईफ लाईन असेही संबोधतात. ब्रिटीशांनी एकेरी रेल्वे ट्रॅक तयार केला होता. भारतीयांनी तो दूहेरी केला व तब्बल पन्नास वर्षानी मुंबई-हावडा रेल्वे मार्ग तिहेरी होत आहे.हावडा-नागपूर-मुंबई दरम्यान मालवाहतूक गाड्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून दूहेरी रेल्वे ट्रॅकवरील प्रवाशी रेल्वेगाड्यांना त्यामुळे मोठा फटका बसतो मालवाहतूक गाड्या विना थांबा तिसऱ्या ट्रॅकवरून धावणार असल्याची माहिती आहे. देशांतर्गत स्वस्त मालवाहतुकीकरीता रेल्वेला उद्योगती प्रथम पसंती देतात. केंद्र शासनाला दरवर्षी कोट्यवधींचा महसूल यातून प्राप्त होणार आहे.प्रवाशी गाड्यांची संख्या वाढणारतिसºया रेल्वे ट्रॅकमुळे मालवाहतूक गाड्यांना स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालय या मार्गावर प्रवाशी रेल्वेगाड्या वाढविणार आहे. छत्तीसगड, ओरीसा, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यात थेट मालांची ने-आण तथा प्रवाशांना मोठी सेवा उपलब्ध होणार आहे. केंद्र शासनाचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे समजते.नागपूर-बिलासपूर शटल ट्रेनतिसºया रेल्वे ट्रॅक उपलब्ध झाल्यानंतर केंद्र सरकार नागपूर-बिलासपूर अशी शटल ट्रेन सुरू करणार असल्याचे समजते. प्रथम टप्प्यात नागपूर-गोंदिया, रायपूर, बिलासपूर असा हा प्रवास राहणार आहे. याकरिता इतर खर्च येणार नाही. प्रवाशांना सोयीचे व महाराष्ट्र छत्तीसगड अशी कनेक्टव्हीटी येथे वाढणार आहे. पुढील काळात भारतीय रेल्वे हायटेक होणार असून महसूल वाढ हा त्यामागील एक हेतू असल्याचे समजते.