शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

लोकमत सामान्यांचा तिसरा डोळा

By admin | Updated: November 6, 2015 02:02 IST

शासन आणि प्रशासनातील उणिवा वृत्तपत्राच्या माध्यमातून समोर आणून ‘लोकमत’ जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय

भंडारा : शासन आणि प्रशासनातील उणिवा वृत्तपत्राच्या माध्यमातून समोर आणून ‘लोकमत’ जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करीत आहे. लोकमत हा तळागाळातील व जनसामान्यांचा तिसरा डोळा असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. मराठीचा सन्मान असलेला आणि ज्याची वर्षभरापासून वाचकांना प्रतीक्षा असते, अशा ‘लोकमत दीपोत्सव-२०१५’ या विशेषांकाचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सांवत आणि खासदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अतिथी म्हणून भंडाऱ्याचे नगराध्यक्ष बाबुराव बागडे, उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिल्लारी, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे उपस्थित होते. तत्पूर्वी लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय बाबुजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.यावेळी खा.पटोले म्हणाले, आम्ही कधी सत्तेत तर कधी विरोधी पक्षात होतो, तरीसुद्धा लोकमतने न्यायच दिला आहे. चुकले तिथे लोकमतने मार्गदर्शकाची भूमिका बजावली. लहान मुलांसाठी स्पर्धाविषय माहिती असो की युवा मंच, सखी मंच, बालविकास मंच या माध्यमातून समाजाला जोडण्याचेही काम लोकमत करीत आहे. केवळ लोकांना जोडलेच नाही तर त्यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिला आहे. लोकमतने जनसामान्यांच्या समस्यांना आपल्या समस्या समजून न्याय मिळवून दिला. हे व्रत निरंतर सुरू राहावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.प्रास्ताविकात जिल्हा प्रतिनिधी नंदू परसावार यांनी मुंबईपासून भंडारापर्यंत एकाच दिवशी एकाच वेळेला दीपोत्सव विशेषांकाचे लोकार्पण होत असल्याची माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ.विकास ढोमणे, अ.भा. प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रमेश सिंगनजुडे, नगरसेवक विकास मदनकर, नगरसेवक सुर्यकांत ईलमे, कार्यालयप्रमुख मोहन धवड, वितरण विभागाचे विजय बनसोड, लोकमतचे प्रतिनिधी इंद्रपाल कटकवार, नगर प्रतिनिधी देवानंद नंदेश्वर, जाहिरात विभागाचे विनोद भगत, तुमसर तालुका प्रतिनिधी मोहन भोयर, लाखनीचे तालुका प्रतिनिधी चंदन मोटघरे, तुमसरचे शहर प्रतिनिधी राहुल भुतांगे, वरठीचे वार्ताहर तथागत मेश्राम, सिल्लीचे वार्ताहर अनिल चोपकर, पुंडलिक हिवसे, वितरक संघटनेचे अध्यक्ष किशोर मोरे, लोकमतचे वितरक क्रिष्णा मस्के, विजय निर्वाण, आहुजा डोंगरे, नरेंद्र गौरी, शिवा गायधने, प्रदीप घाडगे, रमेश सेलोकर उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)लोकमतचा स्तुत्य उपक्रम -डॉ.सावंत४राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सांवत यांनी दीपोत्सव-२०१५ चे अवलोकन करुन लोकमतच्या या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. वृत्तपत्रामध्ये लोकमतचे कार्य वाखाण्याजोगे असून जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे हे वृत्तपत्र आहे. राज्यात एकाच दिवशी लोकार्पण करुन वाचकांच्या हातात अंक देण्याची किमया लोकमतच करु शकतो, असे सांगून त्यांनी टीमवर्कचे कौतुक केले.