शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक विचार करा, आयुष्यात यशस्वी व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 21:34 IST

मकर संक्रांत आली की, प्रत्येक जण तीळगूळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणतात. मात्र लवकरच ते विसरूनही जातात. किरकोळ कारणावरून वाद निर्माण होतात. प्रत्येकाने आपला दृष्टिकोण सकारात्मक ठेवला तर मनुष्य आयुष्यात निश्चितच यशस्वी होतो, असा मंत्र भंडाराचे निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दिला.

ठळक मुद्देआरडीसी विजय भाकरे यांचा मंत्र

भंडारा : मकर संक्रांत आली की, प्रत्येक जण तीळगूळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणतात. मात्र लवकरच ते विसरूनही जातात. किरकोळ कारणावरून वाद निर्माण होतात. प्रत्येकाने आपला दृष्टिकोण सकारात्मक ठेवला तर मनुष्य आयुष्यात निश्चितच यशस्वी होतो, असा मंत्र भंडाराचे निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दिला.मकरसंक्रांतीच्या पर्वावर ‘लोकमत’तर्फे ‘गुड’ बोला, गोड बोला अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत बोलताना विजय भाकरे म्हणाले, देश जोडण्यासाठी देशातील माणसाची मने आपआपसात जुळणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकांच्या मनातील कटुता, विद्वेश, सुडाची भावना समुळ नष्ट करणे आवश्यक झाले आहे. बंधूभाव व प्रेमपूर्वक वर्तन हे चांगल्या विचारातून निर्माण होते. मकरसंक्रांत हा केवळ गोड बोला अशा शुभेच्छा देण्याचा नाही तर हा विचार मनात रुजविण्यासाठी अत्यंत पोषक आहे. आपल्या देशात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे म्हटले जाते. हा प्रेमाचा संदेश कायमस्वरुपी रूजवायचा असेल तर प्रत्येकाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याची गरज आहे. व्यक्ती सुखी, समाधानी, बंधूभाव व प्रेमाने ओतप्रेत असेल तर संपूर्ण समाज आणि देश बलशाली होण्यास विलंब लागणार नाही. त्यासाठी आपल्या देशातील सण उत्सव महत्वपूर्ण ठरतात. अशा सण उत्सवाच्या माध्यमातून समाजात एकात्मता निर्माण करणे पोषक ठरते, असे आरडीसी विजय भाकरे यांनी सांगितले.मकरसंक्रांतीचा सण हा परिवर्तनाची नांदी ठरणारा आहे. तीळगूळ घ्या गोड गोड बोला असू म्हणून बंधूभाव व प्रेमाचे प्रतिक तीळगूळ वाटून समोरच्या व्यक्तीकडूनही तशाच वर्तनाची अपेक्षा आणि विनंती करणे ही या सणाची महती असल्याचे भाकरे म्हणाले.