शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांच्या अफवेने धास्ती

By admin | Updated: May 20, 2014 23:26 IST

चोर-चोर, धावा-धावा असे वाक्य ग्रामीण भागात दररोज रात्रीला ऐकावयास मिळत असून संपूर्ण गाव चोरांच्या धास्तीने जागा राहात असतो. आज या गावात चोर आले होते,

मोहाडी : चोर-चोर, धावा-धावा असे वाक्य ग्रामीण भागात दररोज रात्रीला ऐकावयास मिळत असून संपूर्ण गाव चोरांच्या धास्तीने जागा राहात असतो. आज या गावात चोर आले होते, काल त्या गावात चोर आले होते अशा अफवांना ऊत आलेला आहे. त्यामुळे यावर आवर घालणे आवश्यक झाले आहे. काही वर्षापूर्वी मोहाडी तालुक्यात अशीच स्थिती आली होती. आणि रात्रीला एखादा अनोळखी व्यक्ती गावात आला तर त्याची विचारपूस करण्याऐवजी त्याला बदडण्यात येत होते. चोरामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी बेटाळ्यात ४ व्यक्तींना, देव्हाड्यात २ व्यक्तींना, पालोर्‍यात एकाला कंठस्नान घातले होते. त्यांच्या मृत्युमुळे संपूर्ण तालुका ढवळून निघाला होता. ही परिस्थिती काही वर्षानंतर पुन्हा अनुभवाला येत आहे. आंधळगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्‍या गावात तर सर्वात जास्त चोरांची लाट आल्याचे जाणवते. कान्हळगाव, टांगा येथे चोर आले होती अशी अफवा आहे. मोहाडीतही शेवटच्या टोकावर बांधलेल्या घराचे दार चोर ठोठावतात, अर्ध्या रात्री काही चोर फिरताना आढळले अशा चर्चा सुरू आहेत. आंध़ळगाव पोलिसांनी पाठलाग करुन दोन अट्टल चोरांना पकडले व त्यांच्या जवळून गावठी पिस्तुल व शस्त्रे जप्त केली अशाही चर्चा आहेत. मात्र या चर्चांना उधाण आल्यामुळे गावाबाहेर किंवा शेवटच्या टोकावर असलेल्या घरात राहणारे कुटुंब धास्तीत संपूर्ण रात्र काढत आहेत. पोलिसांनी या अफवांवर अंकुश लावण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी पोलिसानी रात्रीची गस्त वाढविण्याची गरज आहे. अन्यथा चोरांच्या धास्तीने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या हातून पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता फेटाळता येणार नाही. काही वर्षापूर्वी अशाच अफवेने त्रस्त झालेल्या नागरिकांनी बेटाळ्यात ४ चोरांची चांगलीच धुलाई केली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. देव्हाड्यात सुद्धा दोन अनोळखी व्यक्तींंना चोर समजून मारहाण करण्यात आली होती तर पालोर्‍यात एका अनोळखी व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती, ज्यात त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या दृष्टीने आता उपाययोजना करणे गरजेचे आहे. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही. (शहर प्रतिनिधी)