शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

'ते' जीव धोक्यात टाकून पकडतात मासे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2016 03:49 IST

मासे पकडण्यासाठी युवकांनी नवीन युक्ती शोधून काढली. नदी, नाल्यातील कमी पाण्यात जिवंत विद्युत तार सोडून माशांना पकडणे सहज सोपे असले...

धोका : जीवंत विद्युत तारेचा करतात वापर प्रमोद प्रधान  लाखांदूरमासे पकडण्यासाठी युवकांनी नवीन युक्ती शोधून काढली. नदी, नाल्यातील कमी पाण्यात जिवंत विद्युत तार सोडून माशांना पकडणे सहज सोपे असले तरी हा सर्व प्रकार जिवावर बेतणारा आहे. यावर संबंधित विभागाने चौकशी करून कार्यवाही करणे गरजेचे आहे.उन्हाळ्याच्या दिवसात नदी, नाल्यातील पाणी कमी होते. याचाच फायदा घेत ग्रामीण भागातील विद्यार्थी व युवक वर्ग मासे पकडण्यासाठी जातात. चुलबंद नदी व नाल्यात अशावेळी मासे पकडणे सहज सोपे जाते. अशातच जवळच्या जिवंत विद्युत तारांचा वापर करून काही विद्यार्थी पाण्यात सोडतात. जिवंत विद्युत तार पाण्यात पडताच मासे वर येतात व मृत्यू मुखी पडतात. नंतर मासे पकडले जातात. यावेळी अनावधानाने जिवंत विद्युत तार पाण्यात पडली तर पाण्यातील उभे असलेले सर्व मासे पकडणारे मृत पावल्याची शक्यता नाकारता येत नाही. हा सर्व प्रकार गंभीर असूनही तालुक्यातील चुलबंद नदी काठावरील विद्यार्थी व युवक वर्ग नदीवर मासे पकडण्यासाठी जाताना दिसतात. यापूर्वी तालुक्यात असाच प्रकार सुरू असताना एका शाळकरी विद्यार्थ्यांचा जिवंत विद्युत तार मासे पकडण्यासाठी सोडताना मृत्यू झाल्याची घटना घडली होती. संबंधित विद्युत विभागात दांडेगाव, कोच्छी, जैतपूर, खोलमारा या भागात चौकशी करून त्यांचेवर कार्यवाहीची मागणी केली आहे. जेणे करून अपघात टाळता येवू शकेल.